आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाचोरा - येथील संभाजीनगरातील सुमन पोतदार (वय 70) या वृद्धेच्या रहस्यमय मृत्यूचा उलगडा पावणेदान महिन्यांनंतर झाला. आत्महत्या नसून तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यातील एक वृद्धेच्या नातेसंबंधातील आहे. इस्टेटीवरून तर खून झाला नसावा ना याचे धागेदोरे पोलिस शोधत आहेत.
सुमन पोतदार या वृद्धेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार दि.29 सप्टेंबर रोजी उघडकीस आला होता. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, परंतु मयत वृद्धेच्या नातलगांनी खुनाचा संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास केला. उपनिरीक्षक अमोल रसाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विविध शक्यता पडताळून पाहिल्या. कमलेश सोनार या तरुणास ताब्यात घेतले. पोलिसांनी खाकी दाखवताच गुन्हय़ाची कबुली दिली. पावणेतीन लाख रुपयांचे दागिने विकल्याचीही कबुली त्याने दिली. त्याने तीन ते चार सहकार्यांच्या मदतीने दागिने विकून त्यांच्याकडून घेतलेले पैसे त्यांना परत करून उर्वरित पैसे स्वत:जवळ ठेवले. अन्वर नामक युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून लवकरच इतर आरोपी पोलिसांच्या जाळय़ात येतील. आरोपींवर नंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.