आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरणगावमध्‍ये ओमनी-ट्रक अपघातात दोन ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरणगाव - आशिया महामार्ग क्रमांक 46 वर बोहर्डी फाट्याजवळ ओमनी व्हॅन आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर 10 जण जखमी झाले. रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

मुक्ताईनगरक डून भुसावळकडे जाणारी ओमनी व्हॅन (क्रमांक एम.एच.19 वाय-0561) आणि मुक्ताईनगरकडे जाणारा ट्रक (क्रमांक आर.जे.07 जी.बी.3815) यांची फौजी ढाब्याजवळ धडक झाली. अपघातात शोभा सुनील महाजन (वय 26, रा.मेळसांगवी, ता.मुक्ताईनगर), व कैलास भागवत चौधरी (रा.धामणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाबा सुनील पिंजारी (वय 5), शाहीन पिंजारी (वय 4), फातमा समीर पिंजारी (वय 25), जमरुद उस्मान पिंजारी (वय 65, रा.सर्व पंचशीलनगर, भुसावळ), विशाल बाबुराव काटे (वय 32,रा.सारोळा), र्शीकमल बलदीप पवार (वय 26), नितीन नारायण कुंभार (वय 45), नकलीस देवीदास पवार (वय 50, रा.चारठाणा), ओमनीचालक दीपक चिंतामण कायवटे (वय 26) व नसीम बानो (रा.हरताळा) हे सर्वजण जखमी झाले. बोहर्डी ग्रामस्थांनी त्वरित अपघातस्थळी धाव घेत मृतांना आणि जखमींना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशाल काटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस निरीक्षक साहेबराव चव्हाण तपास करत आहेत.