आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रीम पायांच्या जोरावर सुशीलचा 525 कि.मी. खडतर सायकल प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कृत्रीम पायांच्या जोरावर जळगावातील ब्लेड रनर सुशील शिंपी याने मनाली ते खारदुंगला असा ५२५ किलाेमीटरचा खडतर प्रवास सायकलीने सर केला. सायकलीने १८ हजार फूट उंचीवरील हा प्रवास सर करणारा तो पहिला दिव्यांग ठरला आहे. जिद्द चिकाटीच्या जाेरावर त्याने अडथळे पार करीत दिवसात हा प्रवास पूर्ण केला आहे. 

रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावल्यानंतर सुशीलने काही वर्षांपूर्वी दानशूरांच्या मदतीने कृत्रीम पाय बसवले आहेत. या पायांच्या जोरावरच त्याने आत्तापर्यंत ५, १० किलोमीटरच्या अनेक मॅरेथॉन, मनाली ते पांग असा ३३० किलोमीटरचा मोटारसायकल प्रवास पूर्ण केला आहे. तर नुकतेच त्याने समुद्र सपाटीपासून १८ हजार ३२० फूट उंचीवर असलेल्या मनाली ते खारदुंगला हा प्रवास चक्क सायकलीने पूर्ण केला. या वेळी त्याच्यासोबत देशभरातील काही सायकलिस्ट देखील होते. गेल्या पाच वर्षांपासून सुशील विविध प्रकारच्या सायकलिंग, मोटारसायकल रॅली, मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. 
 
या स्पर्धा, उपक्रमांमधून तो सामाजिक संदेश देण्यासह स्वत:ची जिद्द देखील दाखवून देत आहे. मनाली ते खारदुंगला प्रवासासाठी त्याने जुलै महिन्यात सरावास सुरुवात केली होती. सरावादरम्यान तो दिवसाला २० ते ३० किलोमीटर सायकल चालवत होता. ३० जुलै रोजी मनाली येथून त्याने सायकलिंगला सुरुवात केली. दिवसाला ४० ते ५० किलोमीटर अंतर पार करत दिवसात त्याने चक्क ५२५ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. 

संयम ठेवून करावा लागताे प्रवास 
खारदुंगला हे समुद्र सपाटीपासून १८ हजार ३२० फुट उंचावर असून तेथील हवामान सातत्याने बदलत असते. अशात स्वत:च्या शारिरीक मानसिक स्थितीवर नियंत्रण ठेऊन संयमाने प्रवास करावा लागतो. सुशीलने अशा प्रकारे पुन्हा एकदा आपली जिद्द पणाला लावत हा प्रवासही पूर्ण केला आहे. त्याला सहभागासाठी आमदार सुरेश भोळे, जळगाव रनर्स ग्रुपचे किरण बच्छाव, डॉ. अक्षय जोरगे यांनी सहकार्य केले. 
बातम्या आणखी आहेत...