आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरदिवसा अपार्टमेंटमध्ये घरफोडी; तोळे सोने, 10 हजार रुपये लंपास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गणेश कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये चाेरट्यांनी रविवारी दुपारी वाजता शिक्षक दांपत्याचे घर फाेडले. घरमालक अर्ध्या तासासाठी जेवणासाठी बाहेर पडताच चाेरट्यांनी लॅच लॉक तोडून हात साफ केला. यात चाेरट्यांनी घरातून सात तोळे सोन्याचे दागिने दहा हजार रुपयांची रोकड लंपास केली. दरम्यान, चोरटे एका चारचाकी वाहनाने आले असल्याची माहिती परिसरातील काही महिलांनी पाेलिसांना दिली. 
 
गणेश कॉलनी चौकात असलेल्या श्रीहरीनगरातील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावरील दोन क्रमांकाच्या ब्लॉकमध्ये अरुण सुरेश ठाकरे हे पत्नी कविता यांच्यासह राहतात. ठाकरे हे नूतन मराठा विद्यालयात शिक्षक असून, त्यांच्या पत्नी कविता ह्यादेखील उमवित लेक्चरर म्हणून नोकरीस अाहेत. दरम्यान, शनिवारी रात्री कविता ठाकरे ह्या पुण्याला मुलाकडे गेल्या होत्या. 
 
तसेच रविवारी दुपारी वाजता अरुण ठाकरे हे जेवणासाठी घरापासून अगदी ४०० मीटर अंतरावर राहणारे त्यांचे सासरे प्रा.बी.जे.जाधव यांच्याकडे गेले होते. त्यांनी मुख्य दरवाजा लॅच लॉकने बंद केला होता. अर्ध्या तासात ते जेवण करून घरी परतले तेव्हा दरवाजाला केवळ कडी लावलेली होती.
 
लॅच लॉक कापून दरवाजा उघडला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात जाऊन पाहिल्यानंतर सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. याविषयी ठाकरे यांनी शेजारच्यांसह नातेवाइकांना माहिती दिली. 
 
हा ऐवज केला चोरी 
चोरट्यांनीहॉलमधील चार ड्रॉवर, बेडरूममधील दोन कपबर्ड, ड्रॉवर, देवघरातील काही ड्रॉवर स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने तोडून त्यातील मिळेल तो ऐवज चोरून नेला. चाेरट्यांनी अवघ्या २० मिनिटांत तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत, तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या रिंगा, दोन मोबाइल दहा हजार रुपये कॅश असा सुमारे लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 
चारचाकीने आले चोरटे; प्रत्यक्षदर्शी महिलांची माहिती 
ठाकरे हे दुपारी वाजता घरातून बाहेर पडल्यानंतर काही मिनिटांतच त्यांच्या अपार्टमेंटच्या बाहेर सफेद रंगाची एक चारचाकी येऊन उभी राहिली. यातून ते जण खाली उतरले. घाईघाईत हे लोक अपार्टमेंटमध्ये शिरले. २० मिनिटांत ते अपार्टमेंटमधून बाहेर येऊन चारचाकीने महामार्गाच्या दिशेने निघून गेले.
 
ही चारचाकी अपार्टमेंटमधून बाहेर जाताना परिसरातील काही महिलांनी पाहिली होती. त्यांनी तशी माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, या चोरट्यांनी घर फोडताना अत्यंत शांतता पाळली. त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या कुटुंबांनादेखील कोणत्याही प्रकारचा आवाज आला नाही.
 
पोलिसांनी तपासले सीसीटीव्ही फुटेज 

परिसरातील महिलांनी दिलेल्या माहितीच्या अाधारावर पोलिसांनी श्रीहरीनगरात येणाऱ्या जाणाऱ्या सर्व मार्गांवर तपासणी केली. काही दुकाने, बंगल्यांच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी पोलिसांनी केली. चोरट्यांनी वापरलेल्या चारचाकीप्रमाणे वर्णन असलेले वाहन सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे. त्या अनुषंगाने त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.
 
जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गिरधर निकम यांच्यासह पथकाने ठाकरे यांच्या घराची पाहणी करून चोरट्यांचा तपास सुरू केला. तसेच ठाकरे यांच्या घरातील कपाट, ड्रॉवर कपबर्डवर उमटलेले चोरट्यांच्या हातांचे ठसे घेण्यात आले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...