आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारखेड्यात बारागाड्या अाेढताना एकाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोरा - तालुक्यातील तारखेडा येथे पिराेबा महादेव यात्राेत्सवानिमित्त बारागाड्या अाेढताना खाली पडून चाकाखाली चिरडला गेल्याने भगताच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेत भगतासह दाेन जण जखमी झाले अाहेत. तारखेड्यात पाैर्णिमेला हाेणाऱ्या यात्राेत्सवाला ५० वर्षांची परंपरा अाहे. त्यानुसार रविवारी सायंकाळी चार वाजता बारागाड्या अाेढण्याच्या कार्यक्रमासाठी परिसरातून शेकडाे भाविक दाखल झाले. भगत अाेंकार पाटील हे बारागाड्या अाेढत हाेते. या वेळी त्यांचे सुपुत्र बापू पाटील (४८) हेदेखील साेबत चालत हाेते. बारागाड्या अर्ध्या मार्गावर अाल्या असता बापू पाटील ताेल जाऊन खाली पडले बारागाड्यांचा वेग जास्त असल्याने ते चाकाखाली चिरडले गेले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. त्याच वेळी भगत अाेंकार पाटील प्रदीप चव्हाण हेदेखील खाली पडले. त्यात चव्हाण यांचे दाेन्ही पाय फ्रॅक्चर झाले अाहेत.

गाेंधळामुळे वेळ वाया...
घटना घडली त्या वेळी माेठ्या प्रमाणात गाेंगाट सुरू हाेता. त्यामुळे नेमके काय झाले, हे बराच वेळ काेणालाच समजले नाही. मुलगा बापू हा बारागाड्यांखाली अाल्याचे लक्षात येताच भगत अाेंकार पाटील यांनी अाक्राेश सुरू केला. शेवटी ते स्वत: मागच्या गाड्यासमाेर अाले तेव्हा सर्व गाड्या जागच्या जागी थांबल्या.

मागील वर्षीही अाघात...
अाेंकार पाटील यांच्या माेठ्या मुलाचा मागील वर्षी यात्राेत्सवादरम्यानच अाजारपणाने मृत्यू झाला हाेता. त्यामुळे या वर्षी ते बारागाड्या अाेढण्यास नकार देत हाेते. ही जबाबदारी पुढे मुलगा बापूला पार पाडावी लागणार असल्याने त्यांनी त्यास बारागाड्या अाेढायला तयार केले; परंतु बारागाड्या अाेढताना झालेल्या अपघातात बापूचा मृत्यू झाला.