आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • On Parola Highway Omani Catch Fire, No Life Damage

पारोळा महामार्गावर ओमनीने घेतला पेट; जीवितहानी टळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारोळा - बुलडाण्याहून धुळ्याकडे जाणाऱ्या मारुती ओमनी गाडीने शॉर्टसर्किटमुळे पेट घेतला. यात गाडी जाळून खाक झाली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ही घटना महामार्गावरील मराठखेडे गावाजवळ १७ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत संजय बळीराम इंगळे याने पोलिसांत खबर दिली. ते मारुती ओमनी गाडी (एमएच-२८- सी- ५६३४) ने बुलडाणा येथून मित्राच्या सालीच्या मुलीस बघण्यासाठी सकाळी निघाले होते. तालुक्यातील मराठखेडे गावाजवळ अचानक शॉर्टसर्किट झाल्याने गाडीतून धूर निघू लागला. हा प्रकार लक्षात येताच गाडीतील पाचही जण तातडीने खाली उतरले, त्यामुळे ते बचावले. यात एक ते दीड लाख रुपये किमतीच्या गाडीचे नुकसान झाले. या प्रवासातील बॅगा, दोन मोबाइल इतर साहित्यदेखील जळले अाहे. याबाबत पोलिसांत अकस्मात आगीची नोंद झाली. तपास हेडकॉन्स्टेबल सुभाष साळुंखे करीत आहेत.