आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गाच्या साइडपट्ट्यांवर दगडांचे ढीग पडून, एप्रिल महिन्यापासूनच विषय चर्चेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील साईडपट्ट्यांची पावसामुळे दुरवस्था झाली अाहे. साईडपट्या खाेल गेल्यामुळे ठेकेदाराकडून साईडपट्या बुजविण्यासाठी मुरूम टाकण्यात येत अाहे. हा मुरूम निकृष्ट असल्याने यातील निम्मेधिक दगड महामार्गाच्या लगत पडून अाहेत. त्या दगडांमुळे अपघाताचा धाेका निर्माण झाला अाहे. 
 
जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शहराच्या हद्दीमध्ये साईडपट्ट्या खाेल गेल्या अाहेत. एप्रिल महिन्यापासूनच साईडपट्ट्या बुजविण्याचा विषय चर्चेत अाहे. महामार्गाच्या संपूर्ण दुरूस्तीचा वार्षिक ठेका भुसावळ येथील ठेकेदाराला देण्यात अाला अाहे. एप्रिल-मे महिन्यात साईडपट्ट्या बुजवितांना गुणवत्ता राखली गेली नाही. निकृष्ट दर्जाचा मुरूम वापरल्याची तक्रार खुद्द अामदारांनी जिल्हा नियाेजन समितीच्या बैठकीत केली हाेती. पावसाळ्यामध्ये या निकृष्ट कामाचे वाभाडे निघाल्याने साईडपट्ट्यांचा मुद्दा पुन्हा एेरणीवर अाला अाहे. 
 
त्यामुळे ठेकेदाराने पावसाची उसंत पाहून साईडपट्ट्या बुजविण्याचे काम हाती घेतले अाहे. गेल्या दाेन दिवसांपासून महामार्गावर मुरूम टाकला जात अाहे. या मुरूमामध्ये ४० ते ५० टक्के माेठ्या कठीण खडक, दगडाचा समावेश अाहे. काही ठिकाणी हे दगड साईडपट्ट्यावर पसरविण्यात अाले अाहेत. तर काही ठिकाणी नागरिकांनी अाेरड केल्यामुळे दगड बाजूला सारून साईडपट्ट्या भरल्या जात अाहेत. मुरूम साईडपट्ट्यावर टाकल्यानंतर उरलेल्या दगडांचे ढिग ठिकठिकाणी टाकण्यात अाले अाहेत. 

महामार्गावरील साइडपट्ट्यांसाठी मुरूम टाकण्यात आला आहे. मात्र, मुरूमात असलेले मोठे दगड महामार्गाच्या कडेलाच टाकल्याने ते अपघातास निमंत्रण देत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...