आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकाच आरोपीला दिवसभरात दोनदा अटक; दोनदा जामीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - खटल्याकामीवारंवार वॉरंट काढूनही हजर राहणारा संशयित सत्यजित अकोले (रा.रिंगरोड) याला मंगळवारी एकाच गुन्ह्यात दोन वेळा अटक करण्यात आली असता, त्याला दोन्ही वेळा जामिनावर सोडण्यात आले.
पोलिस प्रशासन आणि न्यायालयीन कर्मचा-यांच्या नजरचुकीमुळे हा प्रकार घडला आहे. अकोले याला सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केले. त्याच्या विरुद्ध जामीनपात्र वॉरंट असल्यामुळे जिल्हापेठचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी त्याला वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडून दिले. काही वेळानंतरच हे वॉरंट अजामीनपात्र असल्याची चर्चा झाली. मात्र, या घडामोडीत एका संशयिताला दिवसातून दोन वेळा अटक जामीन मिळाल्याचा अनुभव आला.

न्यायालयाकडून जामीन
जिल्हापेठपोलिसांनी सकाळी सोडून दिलेल्या आरोपीला दुपारी पुन्हा अटक केली. त्यानंतर न्यायालयाने ते जामीनपात्र वॉरंट असल्याचे स्पष्ट केले आणि त्याला जामीन मंजूर केला. हे वॉरंट बजावताना न्यायालयातील कर्मचा-यांकडून अजामीनपात्र असल्याची नोंद केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सायंकाळी स्पष्ट झाले.