आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"इन्कलाब'चा नारा देत स्पर्धेचा श्रीगणेशा, ‘सिटी लाइट’, ‘टू बी ऑर नॉट...’ एकांकिका सादर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - "इन्कलाब जिंदाबाद'चा नारा देत एकांकिका स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. आप्पासाहेब अॅड.आर.एस.लिंगायत प्रतिष्ठानतर्फे आयोजित खुल्या मराठी एकांकिका स्पर्धा अर्थात ‘एस.पी.करंडक’चे आयोजन गंधे सभागृहात करण्यात आले आहे. या दोन दिवसीय स्पर्धेचे उद‌्घाटन शनिवारी आमदार सुरेश भाेळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शंभू पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. आर.एस.लिंगायत, योगेश शुक्ल, विनोद ढगे, श्रीपाद जोशी, समीर तडवी तर श्रीकांत खटोड उपस्थित होते.

शनिवारी यात अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळ यांच्यातर्फे वीरेंद्र पाटीललिखित दिग्दर्शित ‘हम सब बे "चैन' हैं’ या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. विनोदी ढंगाची ही एकांकिका असून तरुणाईशी संबंधित होती. त्याचप्रमाणे भूमी बहुउद्देशीय संस्थेतर्फे कल्पेश नन्नवरेलिखित दिग्दर्शित ‘इन्कलाब जिंदाबाद’ ही एकांकिका सादर झाली. दोन पात्रांचे हे कथानक असून यात एक तरुण पूर्णपणे नैराश्यात बुडालेला त्यातून आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो कसा? बेरोजगारीमुळे कशाप्रकारे त्याला अडचणींना सामोरे जावे लागते, याचे वर्णन केले. या एकांकिकेत ज्ञानेश्वर वाघ आणि हृषीकेश पाटील यांनी भूमिका वठवल्या आहेत.

नाटकातील एका प्रसंगात कलावंत शरयू साेमानी,
नेहा पाटील,
कल्याणी गोरे.
प्रेक्षकांचा अभाव

आयएमआर महाविद्यालयाची दत्ता पाटीललिखित योगेश पाटील दिग्दर्शित ‘सिटी लाइट’ आणि राज गुंगेलिखित किशाेर शिंदे दिग्‍दर्शित ललित कला महाविद्यालयातर्फे ‘टू बी ऑर नॉट...’ अशा एकांकिकाही पहिल्या दिवशी सादर झाल्या. या वेळी मात्र प्रेक्षकांचा अभाव जाणवला. दरम्यान, प्रेक्षकांनी एकांकिका स्पर्धेचा आनंद लुटावा कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिष्ठानचे पवन खंबायत यांनी कळवले.