आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड वर्षीय मुलीचा बादलीत बुडून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - जामनेर येथील दीड वर्षाची कोमल गोविंदा मोरे हीचा अर्धवट भरलेल्या पाण्याच्या बादलीत बुडून गुरुवारी मृत्यू झाला. काेमलला तिच्या आईने दुपारी वाजेदरम्यान आंघाेळ घातली. त्यानंतर तिला झोपवण्याचा प्रयत्न करीत असतानाच आईचा डोळा लागला. आई झोपल्यावर कोमल खेळत खेळत घराजवळील बाथरूमकडे गेली. बाथरूममध्ये पाण्याने अर्धवट भरलेली बादली होती. बादलीत पडलेला ग्लास काढण्यासाठी कोमल वाकली. तसा तिचा तोल जाऊन ती बादलीत पडली. तिच्या आईचा डोळा उघडलावर ती बसलेल्या आजीकडे गेली असावी, असे समजून ती कामाला लागली. मात्र, आजी जवळही कोमल नसल्याने शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर बाथरुममधील बादलीत काेमल उलटी पडलेली दिसली. आईने तत्काळ तिला बाहेर काढले. तिला डाॅक्टरांकडे नेले असता डॉ.प्रमोद पाटील यांनी कोमल मृत झाली असल्याचे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...