आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट डीडी देऊन दुकानदारांना लाखाेंचा गंडा घालणारा जेरबंद, तीन दिवसांची पाेलिस काेठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नाशिक येथे माेठा बांधकाम व्यावसायिक असल्याची बतावणी करून दाेन भामट्यांनी शहरातील तीन दुकानदारांना बनावट डीडी देऊन २०१५ मध्ये लाख ५६ हजार ७७२ रुपयांचा गंडा घातला हाेता. याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात शहर पाेलिसांनी एका भामट्याला रविवारी अटक केली. त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांनी दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली. 

बँकेचा बनावट डीडी देऊन फसवल्याचे पहिलेच प्रकरण शहरात २५ जून २०१५ ते ३० जून २०१५ दरम्यान घडले हाेते. २५ जून २०१५ राेजी हसमुख जैन ऊर्फ सुरेश जैन ऊर्फ प्रफुल्ल किशाेर जैन (वय ३९, रा. गार्डीया गल्लीजवळ, जि. सिराेही, राजस्थान) अाणि कमलेश जैन हे दाेघे शहरात अाले हाेते. ते सुरुवातीला जैनम सॅनिटेशन या दुकानात गेले. 
 
खंडवा येथेही तशीच फसवणूक
दुकानदारांची फसवणूक केल्यानंतर भामटे पसार झाले हाेते. १९ डिसेंबर २०१६ राेजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे अशाच पद्धतीची फसवणूक केलेल्या एका संशयिताला अटक केल्याची माहिती शहर पाेलिसांना मिळाली. यावरून तपासासाठी पाेलिस उपनिरीक्षक चंद्रकांत काेसे, अनिस शेख हे खंडवा येथे गेले हाेते. खंडवा पाेलिसांनी संशयित प्रफुल्ल जैन याला अटक केली हाेती. ताे २०१५ च्या फसवणूक प्रकरणातील अाहे. त्याला रविवारी अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांनी दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली अाहे. याप्रकरणी तपासासाठी एक पथक मुंबईकडे रवाना झाले. 

त्या ठिकाणी त्यांनी नाशिक येथील माेठे बांधकाम व्यावसायिक असल्याची बतावणी केली. त्यानंतर दाेघांनी काही नळ फिटिंगसाठी लागणाऱ्या साहित्याचे नमुने घेऊन अामचा माणूस येईल. त्याच्याजवळ डीडी पाठवताे. त्यानंतर अाॅर्डर केलेले साहित्य पाठवा, असे सांगितले. नंतर हे भामटे रणजीत इलेक्ट्राॅनिक या दुकानात गेले. त्या ठिकाणीही अशाच पद्धतीने बतावणी करून त्यांनी इलेक्ट्रीक फिटिंगसाठी लागणाऱ्या साहित्याचे नमुने घेतले. तसेच स्वामी प्लाझा या दुकानातून एलईडी टीव्ही, एसी बुक केले. दाेन दिवसांनी एक व्यक्ती अाला. सुरुवातीला त्याने जैनम सॅनिटेशनमधून ७८ हजार७७२ रुपयांचे नळ फिटिंगचे साहित्य, रणजीत इलेक्ट्राॅनिक्समधून लाख ३२ हजार ४८० रुपयांचे साहित्य घेतले.
 
तर स्वामी इलेक्ट्राॅनिक्समधून लाख २५ हजार रुपयांचे एलईडी टीव्ही, एसी घेऊन सर्व दुकानदारांना सायंकाळी वाजता सिंडीकेट बँकेचे डीडी दिले. संध्याकाळी डीडी मिळाल्याने दुकानदारांनी ते दुसऱ्या दिवशी बँकेत टाकले. मात्र, ते डीडी बनावट असल्याचे त्यांना सांगितल्यानंतर त्यांना अापल्याला फसवले गेल्याचे समजले. याप्रकरणी ३० जून २०१५ राेजी सिंडीकेट बँकेचे व्यवस्थापक नंदबाळ माराेतराव पवनीकर (वय ५७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. 
बातम्या आणखी आहेत...