आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकूचा धाक दाखवून युवकाचे 10 हजार लुटले; एकास अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एमआयडीसीतील एन सेक्टरमधील भारत पेट्रोलियम कंपनीजवळील दोन भामट्यांनी चाकूचा धाक दाखवून युवकाजवळील १० हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी रात्री १२.३० वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी १५ ऑगस्ट रोजी एका भामट्याला अटक केली. 

म्हाडा कॉलनीतील रहिवासी विलास गिरधर पाटील हे एमआयडीसीतील भारत पेट्रोलियम कंपनीकडून जात असताना मोटारसायकलवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना आडवले. त्यानंतर मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील हजार ५०० रुपये रोख आणि मोबाईल असा १० हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला. या घटनेनंतर पाटील यंानी तत्काळ एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून माहिती दिली. त्यानंतर रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दोन्ही भामट्यांची शोधा-शोध सुरू केली. तर या घटनेच्या वेळी एका टपरीचालकाने यातील एका भामट्याला ओळखले होते. त्याने मंगळवारी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पाेलिसांनी सागर श्रीराम डोईफोडे (वय २२) याला अटक केली आहे. डोईफोडे हा एमआयडीसीतीलच व्ही सेक्टरमध्ये एका कंपनीत काम करतो. त्याला पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर त्याचा साथीदार मात्र, बेपत्ता आहे. बुधवारी डोईफोडे याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गुरुवारी फिर्यादीकडून ओळखपरेड झाल्यानंतर त्याच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. 

शिवाजीनगरमधील अरविंद सोनवणे (वय ३८) आणि त्यांचे मित्र बंटी जाधव, गोपाळ माळी, कमलाकर कोळी हे गप्पा मारत होते. गप्पांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादात कोळी आणि सोनवणे यांच्यात हाणामारी सुरू झाली. कोळी याने धारदार शस्त्राने सोनवणेंच्या उजव्या हातावर वार केले. तर सोनवणेंनी विटांनी मारहाण केल्याचे माळी यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी दोघांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून परस्परांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक सुभाष पाटील, सुरेश पाटील तपास करीत आहे. 
बातम्या आणखी आहेत...