आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजरे हिंगोणा शिवारात गांजाची रोपे आढळली, एकास अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोपडा - तालुक्यातील मजरे हिंगोणा शिवारातील शेतात चवळीच्या पिकात गांजाची लागवड केल्याचे स्थानिक गुन्हा शाखेने शुक्रवारी रात्री धाड टाकून उघड केले. याप्रकरणी एकास अटक करून ३० हजार रुपये किमतीची गांजाची राेपे जप्त केली आहेत. दरम्यान पाटील याने हे शेत विक्री करण्यासाठी एका शेतकऱ्याला खरेदीखत दिल्याचेही समजले आहे.

मजरे हिंगोणा शिवारात आरोपी विजय ऊर्फ नाना भीमराव पाटील (वय ४८) रा. हिंगोणा याने स्वत:च्या कब्जातील शेतात बेकायदेशीररीत्या गांजा या मादक पदार्थाची १२ झाडांची लागवड केली होती. तीन ते साडेतीन फूट उंचीच्या या झाडाचे वजन १५ कि. ग्रॅ. असून त्यांची किंमत ३० हजार रुपये इतकी आहे. गांजाची लागवड झाली त्या शेतात चवळीचे पीक होते. त्याच पिकाच्या मध्यभागी लक्षात येणार नाही, अशा ठिकाणी त्याने अडीच महिन्यांपूर्वी गांजाची १२ झाडे लावली होती. शुक्रवारी रात्री पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते, सहायक निरीक्षक अजय खर्डे, मुस्ताक सैय्यद, मनोहर देशमुख, महेंद्र पाटील, सतीश गवळी यांच्या पथकाने शेतात धाड टाकली. तत्पूर्वी पथकाने रेकी करून ती झाडे गांजाचीच असल्याची खात्री करून घेतली होती. आरोपीविरुद्ध चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.