आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामनेरच्या दाेघांना लाखांत गंडवले, पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रेल्वेत अधिकारी पदावर भरती करून देण्याची बतावणी करत शिरपूरच्या एका ठगाने जामनेर येथील दोघांना आठ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण रविवारी समोर आले. या ठगाला फसवणूक झालेल्या दोघांनीच शिरपूर येथे जाऊन पकडून आणले. पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने त्याला जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

जामनेर येथील केसरीलाल प्रभाकर जैन दीपक चतुर यांना दाेन वर्षांपूर्वी जितेंद्र रामदास पाटील (वय ३२, रा.शिरपूर) भेटला. आपण रेल्वेत मोठे अधिकारी असून नाेकरी लावून देऊ असे सांगत त्यांच्याकडून प्रत्येकी चार-चार लाख या प्रमाणे आठ लाख रूपये घेतले हाेते. पैसे घेतल्यानंतर देखील नोकरीस लागली नाही. यामुळे वर्षभरापासून जैन चतूर यांनी जितेंद्र पाटलाकडे पैसे परत मागण्यास सुरुवात केली. तेव्हा ताे उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर दोघांना त्याने एक लाख रुपये परत केले. मात्र, उर्वरित रक्कम देण्यास तो टाळाटाळ करत होता. शिरपूरला राहता बाहेर राहू लागला होता. ताे शिरपूरमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर जैन चतुर यांनी रविवारी सकाळीच शिरपूर गाठले. त्याला पकडून दुचाकीवर बसवून जामनेरकडे घेऊन जात हाेते. जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात पोहचल्यावर पाटील याने धावत्या गाडीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, इच्छादेवी पोलिस चौकीत असलेल्या पोलिसांना हा गोंधळ दिसल्यानंतर त्यांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांना एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर खरा प्रकार समोर आला. त्यानंतर जामनेर पोलिसांच्या वाहनातून दुपारी वाजता पाटील याला जामनेर ठाण्यात नेण्यात आले. जैन चतूर यांनी पाटील याला पैसे देत असल्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून ठेवले आहे. 

घेतलेले पैसे अधिकाऱ्याला दिले; एक लाख परत केले 
एमअायडीसीपोलिस ठाण्यात आणल्यानंतर पोनि सुनील कुराडे यांनी अाराेपीची चौकशी केली. रेल्वेत नोकरी लावून देण्यासाठी जैन चतुर यांच्याकडून आठ लाख रुपये घेतले होते, ते पैसे पुढे एका अधिकाऱ्याला दिले आहेत. मला आता तो अधिकारी भेटत नाही, तरी देखील एक लाख रुपये परत केले. जितेंद्र पाटील याचा उजवा-डावा पाय दिव्यांग असून त्याची उंची केवळ पावणेचार फूट आहे. 
बातम्या आणखी आहेत...