आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी-टेम्पोच्या अपघातात एक ठार, १७ प्रवासी जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एसटीला प्रवासी घेऊन जाणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिल्याने अपघातात टेम्पोचालक ठार तर १७ प्रवासी जखमी झाल्याची घटना तालुक्यातील वावडदा गावाजवळ सोमवारी सायंकाळी वाजता घडली. सोनू ऊर्फ प्रशांत भगवान वाघ (वय २८ कृष्णापुरी, पाचोरा) असे मृत टेम्पोचालकाचे नाव आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाचोरा आगाराची बसक्रमांक एमएच-२०, जीएल- २२८५ ही जळगावकडे येत असताना वावडद्याजवळ एमएच- २२, - १३८१ या टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो बसवर जाऊन धडकला. अपघातानंतर तातडीने जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या वेळी जखमींना नेण्यासाठी ट्रेचर उपलब्ध झाल्याने रुग्णालयात गोंधळ उडाला होता.
बसटेम्पोमधील जखमी
लीलाबाईरामभाऊ पाटील, कमलाबाई श्यामराव पाटील, शानुबाई शिवदास पाटील, जागृती अरुण पाटील, कैलास युवराज पाटील (सर्व किनगाव, ता. यावल), पंकज धनगर (वरखेडी, ता. पाचोरा), बस वाहक वाल्मीक जगन्नाथ अहिरे (भडगाव), प्रकाश सुगनचंद बाफना, अजय संजय रक्षे, मंगेश चंदनशिव, विकास चंदनशीव, गणेश अभिमन सपकाळे, गजानन ओंकार मरताडे, विकी भालेराव (सर्व रा. पाचोरा), रामकृष्ण जाधव (विटनेर), मगन भागवत (गिरड), बसचालक नगराज भागवत (पाचोरा) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

छायाचित्र: जिल्हा रुग्णालयात जखमींना दाखल केल्यानंतर नोंद करताना परिचारिका
बातम्या आणखी आहेत...