आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड हजार रक्तदात्यांची वेबसाइट, रुग्णवाहिकांचीही माहिती मिळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढावी म्हणून ‘अवर ब्लड ग्रुप’ (www.ourbloodgroup.com) नावाची वेबसाइट तयार करण्यात आली आहे.
अवघ्या १५ दिवसांत या वेबसाइटवर १५००पेक्षा जास्त रक्तदात्यांनी आपली माहिती अपलोड केली. या वेबसाइटचे लोकार्पण रविवारी करण्यात येणार असून, कृणाल महाजन तुषार भारंबे यांनी ही वेबसाइट तयार केली आहे.

ही वेबसाइट केवळ एका रक्तपेढीची किंवा एका शहरासाठी नाही, तर तिचा उपयोग देशभरातील सर्व रक्तपेढ्या, रक्तदाते, गरजू रुग्ण शिबिर संयोजकांना होईल. जास्तीत जास्त नागरिक संस्थांनी या वेबसाइटचा वापर केल्यास जास्त प्रमाणात हेतू साध्य होणार आहे. गेल्या पंधरवड्यात या वेबसाइटची निर्मिती करण्यात आली. अवघ्या काही दिवसांतच १५०० जणांनी त्यावर नोंदणी केली. याशिवाय आता राज्यातील इतर शहरांसाठीही ही वेबसाइट खुली करण्यात येणार आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून गरजू नागरिकांना वेळेवर रक्ताचा पुरवठा करण्यास मोठी मदत होणार आहे. देशभरातील नागरिकांना या वेबसाइटचा फायदा हाेणार आहे. वेबसाइटवर अधिकाधिक माहिती उपलब्ध करण्यात येणार आहे.

काय आहे वेबसाइटमध्ये?
यावेबसाइटच्या होम पेजवर रक्तदात्यांची यादी, रक्तदानाविषयी माहिती, जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचे पत्ते फोन नंबर आहेत. त्यात ब्लड बँका, १५००पेक्षा जास्त रक्तदात्यांची नावे, रक्तगट, फोन नंबर १५ रुग्णवाहिकांची माहिती सध्या अपलोड आहे. येणाऱ्या काळात त्यात आणखी माहिती अपडेट होणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणीही सुरू आहे, अशी माहिती कृणाल महाजन यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

तंत्रज्ञानाच्या वापरातून प्रयोग
इंटरनेटवरआपल्याला हवी ती माहिती तत्काळ उपलब्ध होते. त्वरित संपर्क साधण्यासाठी हे प्रभावी माध्यम आहे. रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णाला, त्याच्या नातेवाइकांना डॉक्टरांना इमर्जन्सीमध्ये रक्तदाते शोधण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी या वेबसाइटचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
आज लोकार्पण
यावेबसाइटचे लोकार्पण केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. रविवारी सकाळी १० वाजता पत्रकार भवनात हा कार्यक्रम होईल