आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पेयजल’ साठी १४५ कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोरा - तालुक्यात सन २०१२ ते २०१५ या आर्थकि वर्षात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेसाठी १४४ कोटी ७८ लाख हजार रुपये निधी मंजूर झाला असून ९० टक्के निधीचे वितरण झाले आ. योजना पूर्ण झाल्याने ३१ गावांपैकी केवळ निंभोरी येथील योजना पूर्णत्वास येऊन त्या गावातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आ. वेरुळी खुर्द येथे समितीचा प्रतिसाद मिळाल्याने ही योजना रद्द करण्यात आली.

पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याकामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधकिारी आस्तकिकुमार पांडे, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अिभयंता ठाकूर, उपकार्यकारी अिभयंता एस.एस.पवार, शाखा अभियंता आर.पी.वानखेडे सतर्क राहून योजना कार्यान्वित करीत आहेत. तालुक्यात सन २०११-२०१२ २०१२-२०१३ या आर्थकि वर्षात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई झाल्याने विहिरी खोल करणे, हातपंप बसवणे, इंधन विहिरी, विहिरी अधिग्रहीत करणे, टॅकरने पाणीपुरवठा करून शासनाचे करोडो रुपये वाया गेले. प्रत्येक गावात कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची टंचाई मिटावी या उद्देशाने शासन स्तरावर निर्णय घेऊन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना मंजूर होण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आ. या योजनेत उद््भव विहिरी, पंप गृह, पंपिंग मशिनरी, उर्ध्वननलकिा, पाणी वितरण व्यवस्था, टाकी दुरुस्ती अशी कामे हाती घेऊन कायम स्वरूपी पाण्याचीटंचाई मिटावी. या उद्देशने पाचोरा तालुक्यात ३२ गावांमध्ये योजना सुरू करून काही गावांमध्ये कामे सुरू झालीत. तर काही गावांमध्ये निधीअभावी योजना सुरू झाल्या नाहीत.

ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याची कामे सुरू
दहिगाव संत येथील योजनेसाठी ५४ लाख ५१ हजार पैकी १५ हजारांचा निधी मिळाला. पंपिंग मशिनरी, उद््भव विहीर पंपगृहाचे काम करण्यात आसे आ. गाळण बुद्रूक बाजार समितीस ७० लाख ६७ हजार पैकी २१ लाख रुपये मिळाले आहेत. विहिरीचे खाेदकाम वगळता इतर सर्व कामे पूर्ण झाली आहेत. हनुमानवाडी येथे पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी नवििदा निघाली आ. कासमपुरा ये‌‌थे ४७ लाख रुपये मंजूर झाले असून कामे सुरू करण्यात आली आहेत.
नगरदेवळ्यासाठी कोटी मंजूर
डांभुर्णीयेथे ४३ लाख ६५ हजार रुपयांची योजना असून योजनेसाठी १३ लाख १० हजार निधी प्राप्त होऊन काम प्रगतीपथावर आहे. पाचोरा तालुक्यातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे असलेले नेहमी पाणीटंचाई असलेले. नगरदेवळा येथे चार कोटी ९८ लाख रुपये मंजूर झाले असून योजना सुरू होण्यासाठी प्रशासकीय मान्यतेचा आदेश बाकी आहे. नांद्रा येथे ९९ लाख ८७ हजार मंजूर निधी पैकी २९ लाख ९६ हजार रुपये मिळून योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. जामने ग्रामपंचायतीस २७ लाख रुपये निधी मंजूर असून नवििदेची प्रक्रिया सुरू आहे. चिंचखेडा बुद्रूक येथे ५६ लाखांची योजना असून पहिल्या हप्त्याच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे.
विविध गावांचा मंजूर मिळालेला निधी
(या निधीतून विहीर खाेदकाम, पाइपलाइन दुरुस्ती, पाण्याच्या टाकीचे बांधकाम, पंपिंग दुरुस्ती, नवीन पाइपलाइनचे काम अशी विविध कामे होती)
बातम्या आणखी आहेत...