आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशातील एकाचा शिरपूरजवळील जंगलात खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- शिरपूर तालुक्यातील बोरपाणी गावाजवळील जंगलात गेल्या आठवड्यात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलेल्या भुऱ्या ब्राम्हणे (पावरा) याचा खून झाल्याचे समोर आले आहे. याबाबत त्याच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दिली आहे. शिवाय संशय असलेल्या धीरू उर्फ धीरेंद्र मेहता याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. घटनेतील मृत, तक्रारदार संशयित मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. 
 
बोरपाणी गावाला लागून वनक्षेत्र आहे. या जंगलातील लंगडीघोटाळी रोडवर एका पळसाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. हा प्रकार २६ एप्रिल रोजी उघडकीस आला होता. तपासाअंती हा मृतदेह भुऱ्या ग्यानसिंग ब्राम्हणे (३८, रा. राणी मोहिदा, ता. पानसेमल, जि. बडवानी, मध्य प्रदेश) याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. यासंदर्भात मृत भुऱ्याची पत्नी हिरूबाई यांनी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. राणी मोहिदा गावातील धीरू उर्फ धीरेंद्र वांगा मेहता हा भुऱ्यासोबत वाद घालत असे. याच वादातून त्याने भुऱ्याला मोटारसायकलवर बसवून अज्ञात स्थळी नेले. त्यानंतर त्याला मारहाण केली. तसेच बोरपाणी गावाच्या जंगलात आणून गळफास देऊन त्याचा मृतदेह झाडावर टांगल्याचा संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात धीरेंद्र मेहता याच्या विरुद्ध भादंवि कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने धीरेंद्रला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख तपास करत आहेत. 
 
कामात सुसूत्रता आणावी 
राणी मोहिदा या गावातील कांतीबाई हिच्या घराच्या जागेचा वाद होता. त्यामुळे कांतीबाई धीरेंद्र यांच्यात भांडणही झाले होते. भांडणाच्या वेळी भुऱ्या ब्राम्हणे याने कांतीबाईची बाजू घेतली होती. त्यामुळे धीरेंद्र मेहता याच्या डोक्यात त्याच्या विषयी राग होता. त्याच रागातून भुऱ्या ब्राम्हणे याचा खून केल्याचा संशय हिरूबाई यांनी व्यक्त केला होता. 
बातम्या आणखी आहेत...