आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वायुसेना भरतीसाठी आज शहरात एक लाख उमेदवार येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भारतीय वायुसेनेतील एअर मॅन ग्रुप वाय नॉन टेक्निकल ट्रेडस या पदासाठी मंगळवारपासून मू. जे. महाविद्यालय परिसरात भरती मेळाव्यास सुरुवात होणार आहे. या भरतीसाठी २३ जिल्ह्यातून एक लाख उमेदवार शहरात येणार आहेत. 

भरतीसाठी अमरावती, अकोला, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, उस्मानाबाद, पालघर, परभणी, रायगड, रत्नागिरी येथील उमेदवार येणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके यांनी भरती स्थळावरील सुविधांची पाहणी केली. भरतीसाठी सोमवारी रात्रीच शहरात काही उमेदवार दाखल झाले. या उमेदवारांच्या निवासाची व्यवस्था दर्जी फाउंडेशनतर्फे सागर पार्क येथे मंडप उभारून करण्यात आल्याचे गोपाल दर्जी यांनी सांगितले. 

 
बातम्या आणखी आहेत...