आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजार साड्यातून एक लाख कापडी पिशव्यांची निर्मिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तासाभराच्या वापरानंतर कचऱ्यात जाणाऱ्या कॅरीबॅगमुळे उद््भवणारी समस्या टाळण्यासाठी शहरातून ‘कॅरीबॅग हटाओ’ अभियानाला सुरुवात झाली अाहे. येत्या दाेन महिन्यांत पाच हजार साड्या गाेळा करून त्यातून एक लाख कापडी पिशव्या बनवून त्यांचे वाटप करण्याचा संकल्प महापालिका अाॅफिसर क्लबने केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दाेन साड्या देऊन या उपक्रमाचा श्रीगणेशा केला अाहे.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर घराघरांतून बंद व्हावा, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू झाले अाहे. ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगचा वापर करू नये, यासाठी कायदाही तयार करण्यात अाला. कारवाई, जप्ती, दंड अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कारवाई करून ही त्याला अाळा घालण्यात अपेक्षित यश अद्याप अालेले नाही. त्यामुळे उत्पादक विक्रेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा वापर करणाऱ्या जनतेची सवय बदलण्यासाठी महापालिका अाॅफिसर क्लबने संयुक्तरीत्या उपक्रम हाती घेतला अाहे. अाॅफिसर क्लबच्या सर्व सदस्यांना अावाहन करून त्यांच्याकडून प्रत्येकी दाेन साड्या प्रतिसाडी ५० रुपये घेण्यात येत अाहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून एका साडीतून २० कापडी पिशव्या तयार करण्यात येणार अाहेत. अाराेग्य अधिकारी डाॅ. विकास पाटील यांनी ही संकल्पना अधिकारी, डाॅक्टर अभियंते यांच्याजवळ व्यक्त केल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला अाहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी खुद्द दाेन चांगल्या प्रतीच्या साड्या या उपक्रमासाठी दिल्या अाहेत.
४०० कापडी पिशव्या तयार
अाठवडाभरात सुमारे ४०० पेक्षा जास्त कापडी पिशव्या तयार केल्या असून त्या चाैकाचाैकांत नागरिकांना वाटप केल्या जाणार अाहे. तसेच त्यांच्याकडून कॅरीबॅग वापरणार नाही, असे प्रतिज्ञापत्रही लिहून घेणार अाहे. शहरातून हजार साड्या गाेळा करून लाख कापडी पिशव्या तयार करण्याचा मानस आहे. डाॅ.विकास पाटील, आरोग्य अधिकारी
बातम्या आणखी आहेत...