आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुस्तावलेली पोलिस यंत्रणा झाली खडबडून जागी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्या दीड महिन्यात शहरात तब्बल २३ चोऱ्या आणि घरफोड्यांच्या घटना घडल्या असून, सुस्तावलेली पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. चोऱ्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे विशेष पथक ईगल पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच दिवस-रात्र गस्त घालण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
आॅक्टाेबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चोरट्यांनी शहरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे पो‍लिस प्रशासन कामाला लागले होते. त्या वेळी पो‍लिसांनी चार घरफोड्यांना अटक करत त्यांची रवानगी कारागृहात केली होती. या भीतीमुळे महिनाभर शहरात एकही चोरी झाली नाही. मात्र, सोमवारी मध्यरात्री आणि मंगळवारी पहाटे दुपारी चोरट्यांनी शहरात सहा ठिकाणी चोऱ्या करत नागरिक पो‍लिस प्रशासनाची झाेप उडवली आहे.
दीड महिन्यात २३ चोऱ्या
दिवस-रात्र गस्त
-शहरातसुरू असलेल्या घरफोड्यांमुळे गस्त वाढवली आहे. त्यासाठी विशेष पथक, ईगल पथक िनयमित पथकाला रात्री दिवसाही गस्त घालण्यास सांगण्यात आले आहे. गस्त घालताना कर्मचाऱ्यांनी कसूर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होईल. प्रशांतबच्छाव, उपविभागीयपो‍लिस अधिकारी