आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘बीएचआर’ विरोधात आणखी एक गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भाईचंदहिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.च्या (बीएचआर) गणेश कॉलनी शाखेतील अपहारप्रकरणी प्रमोद रायसोनींसह २० संचालक अन् कर्मचा-यांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी सोमवारी दाखल झालेल्या गुन्ह्यात रायसोनी यांच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ झाली अाहे.
पाचोरा येथील नंदा भिका पाटील यांनी जानेवारी २०१४पासून बीएचआरच्या गणेश कॉलनी शाखेत वेळोवेळी पैसे भरून ९० हजार ४०० रुपयांची ठेव जमा केली होती. मुदत संपल्यानंतरही ठेव परत मिळाल्याने जिल्हापेठ पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार रायसोनी यांच्यासह २० संचालकांवर गुन्हा दाखल झाला.

हेआहेत संशयित : शिंदेमॅडम (पूर्ण नाव नाही), प्रभारी व्यवस्थापक दिनेश चौधरी, रोखपाल मितेश पोतदार, संस्थापक- चेअरमन प्रमोद भाईचंद रायसोनी, चेअरमन दिलीप चोरडिया, व्हाइस चेअरमन मोतीलाल जिरी, सूरजमल जैन, दादा पाटील, भागवत माळी, राजाराम कोळी, भगवान वाघ, हितेंद्र महाजन, इंद्रकुमार ललवाणी, शेख रमजान अब्दुल नबी, यशवंत जिरी, ललिता सोनवणे, प्रतिभा जिरी, सुकलाल माळी, श्रेयस नलावडे, प्रल्हाद जिरी.

प्रमाेद रायसोनींच्या कोठडीत वाढ
पहिल्यागुन्ह्यात अटकेत असलेले प्रमोद रायसोनी यांच्यासह १३ संचालकांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती रायसोनी यांच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली. तसेच इतर १२ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, दुस-या गुन्ह्यात या १२ जणांना पुन्हा ताब्यात घेतले.