आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा वेचक मुलांसाठी अाणखी एक सायं शाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - परिवाराची अार्थिक परिस्थिती जनजागृतीचा अभाव यामुळे समाजातील अनेक घटक अाजही शिक्षणापासून वंचित राहतात. यात शहरी भागात कचरा वेचणाऱ्या मुला-मुलींचा त्यात प्रामुख्याने समावेश असताे. अशा शाळाबाह्य मुलांसाठी वर्धिष्णू साेशल रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट साेसायटीने महापालिकेच्या राठी शाळेत सायंकाळचे शैक्षणिक सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला अाहे. पालिका अायुक्तांनीही यासाठी हिरवी झेंडी दर्शवली असून अाठवडाभरात हे केंद्र सुरू हाेईल.

वर्धिष्णू साेशल रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट साेसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दाेन दिवसांपूर्वी अायुक्तांची भेट घेऊन कचरा वेचक मुला-मुलींमध्ये शिक्षणाविषयी गाेडी निर्माण व्हावी, या हेतूने सायंकाळची शाळा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील मनपाच्या राठी शाळेत जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली अाहे. या संस्थेतर्फे सद्या तांबापुरामध्ये मरिमाता मंदिराच्या परिसरात ३० मुलांना शिक्षणाचे धडे दिले जात अाहेत. अाता पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील मुलांसाठी अाणखी एक केंद्र सुरू करण्याचा संस्थेचा मानस अाहे. राठी शाळा ही राेटरी गाेल्ड सिटी या संस्थेने दत्तक घेतली असून शैक्षणिक कार्य सुरू अाहे.

१४ वर्षांखालील १२५ मुले
संस्थेच्यावतीनेदाेन वर्षांपूर्वी सर्व्हे करण्यात अाला हाेता. यात ४०० लाेकांशी संवाद साधला हाेता. चर्चेतून १४ वर्षांखालील सुमारे १२५ मुले शाळेपासून लांब असल्याची माहिती पुढे अाली हाेती. यातील १०० मुले ही शाळाबाह्य हाेती. शहरातील अशा मुलांसाठी सायंकाळी शैक्षणिक सेंटर सुरू केले जाणार अाहे. यात अक्षर अाेळख, अंक अाेळख मूल्य शिक्षणावर भर दिला जाणार अाहे.

दाेन दिवसांत शाळेची पाहणी
पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील शाळाबाह्य मुलांसाठी हा उपक्रम राहणार अाहे. यासाठी अाधी या भागात पाहणी करून पालकांना अावाहन केले जाईल, दाेन दिवसांत शाळेची पाहणी करून अाठवडाभरात सेंटर सुरू केले जाईल. अव्दैत दंडवते, संचालक.
बातम्या आणखी आहेत...