आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Store Third Time Broken, 1 Lakh Rupee Looted

एकच दुकान तिसऱ्यांदा फोडले, एक लाख लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: जुन्या जिल्हा परिषदेसमोरील दुकानात चोरी झाल्यानंतर श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.
जळगाव - शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जुन्या जिल्हा परिषद इमारतीसमोरील भाई-भाई जनरल अॅण्ड प्रोव्हिजन हे दुकान चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून तिसऱ्यांदा फोडून एक लाख पाच हजार रुपये रोख चोरून नेले. छताचा पत्रा धारदार शस्त्राने कापून आत प्रवेश करून चोरी करण्याची पद्धत तिन्ही चोऱ्यांवेळी चोरट्यांनी वापरलेली आहे. यापूर्वी दोन्ही वेळेस चोरी करणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नसताना शुक्रवारी रात्री तिसऱ्यांदा हे दुकान चोरट्यांनी फोडले.

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाच्या प्रवेशद्वाराला लागून वसंत भावलाल भावसार (रा.बळीरामपेठ) यांचे भाई-भाई जनरल अॅण्ड प्रोव्हिजन हे पानमसाल्याचे दुकान आहे. जून २०१०मध्ये चोरट्यांनी हे दुकान फोडले होते. त्या वेळी छताचा पत्रा कापून चोरट्यांनी आत प्रवेश करून २५ हजार रुपयांचे साहित्य पैसे चोरून नेले होते. त्यानंतर गेल्या वर्षीही चोरट्यांनी भावसार यांच्या दुकानासह चार दुकाने याच पद्धतीने फोडली होती. या घटनेत ३० हजार रुपयांचा पानमसाला चोरून नेला होता. शुक्रवारी रात्री हे दुकान तिसऱ्यांदा फोडण्यात आले. दोन्ही चोऱ्यांवेळी चोरट्यांनी छताचा पत्रा कापलेला होता. त्यामुळे भावसार यांनी पत्र्यांच्या आतून लोखंडी सळया लावल्या होत्या. मात्र, चोरट्यांनी पत्र्याबरोबर सळयाही कापून आत प्रवेश केला. या घटनेत दुकानात उतरवण्यासाठी छोट्या मुलाचा वापर केला असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

ईदच्या सुटीमुळे दुकानातच ठेवले पैसे
जावयानेदिलेले पैसे वसंत भावसार यांनी दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवले होते. २५ सप्टेंबर रोजी ते एक लाख रुपये बँक खात्यात भरण्यासाठी गेले होते. मात्र, ईदनिमित्त सुटी असल्याने बँक बंद होती. त्यामुळे ते पैसे घेऊन परत आले. त्या वेळी दुकानातील विक्री केलेल्या मालाचे पाच हजार जावयाने दिलेले एक लाख रुपये सोबत होते. ते एक लाख पाच हजार रुपये त्यांनी ड्रॉवरमध्ये ठेवले होते. शुक्रवारी रात्री वाजता दुकान बंद करून घरी गेले होते.

सामानही फेकले अस्ताव्यस्त : भावसारयांनी शनिवारी सकाळी दुकान उघडले तेव्हा ही चोरी उघडकीस आली. चोरट्यांनी सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. भावसार यांना दुकानाचे पत्र्यांचे छत कापलेले सळई कापून वाकवलेली दिसली.

प्लॉट विक्रीतून जावयाने दिलेले एक लाख चोरीस
वसंतभावसार यांनी त्यांचे जावई राजेंद्र भावसार (रा.तुकारामवाडी) यांच्या नावे भुसावळ रस्त्यावरील मन्यारखेडा शिवारातील पंढरपूरनगर येथे प्लॉट घेतलेला होता. हा प्लॉट घेण्यासाठी भावसार यांनी जावयाला एक लाख रुपये उसनवार दिले होते. त्यांच्या जावयाने २१ सप्टेंबर रोजी तो प्लॉट विकला. या व्यवहारातून मिळालेले पैसे त्यांनी कॅनरा बँकेच्या खात्यात जमा केलेले होते. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी त्यांनी सासरे वसंत भावसार यांच्याकडून घेतलेले एक लाख रुपये त्यांना परत केले. जु