आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Suspected Persons Arrested In The Case Of Dhule Riot

धुळे दंगलप्रकरणी आणखी एका संशयिताला अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - माधवपुरा परिसरात सुमारे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या दंगलप्रकरणी सीआयडी पथकाने बुधवारी अमोल रगाणे नामक तरुणाला अटक केली आहे. सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. यामुळे सीआयडीने आतापर्यंत अटक केलेल्या दंगलखोरांची संख्या 19 झाली आहे.

6 जानेवारी रोजी माधवपुरा परिसरात झालेल्या दंगलीत पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला होता. या दंगलीचा तपास सीआयडी करीत आहे. या प्रकरणी दंगलीसंदर्भात आझादनगर पोलिसांत दाखल गुन्ह्या (क्र.04/2013) मधील कलम 307, 395, 397, 143, 147, 148 मध्ये बडगुजर प्लॉट या परिसरात राहणारा तरुण अमोल गणेश रगाणे (25) याला सायंकाळी 6.30 वाजता अटक करण्यात आली आहे. सीआयडीचे उपअधीक्षक गिरीश पाटील, मोहंमद मोबीन, राजेंद्र माळी, उमेश येवलेकर, शरद काटके यांच्या पथकने ही कारवाई केली. दरम्यान, धुळे दंगलप्रकरणी काल मंगळवारी पहाटे चार व दुपारी एक अशा पाच जणांना अटक झाली होती. सध्या त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. दंगलप्रकरणी आतापर्यंत 18 जणांना अटक झाली आहे. अटक करण्यात आलेला अमोल हा 19वा संशयित आहे.


चौकशी कक्ष
या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्यासाठी आलेले सेवानिवृत्त न्यायाधीश र्शीकांत मातवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र चौकशी कक्ष स्थापन केला आहे. तेथे संबंधितांचे जाब-जबाब घेतले जात आहेत.