आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोरखेड्याच्या महिलेसह चार मुली बेपत्ता, सारंगखेडा पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार - शहादा तालुक्यातील तोरखेडा येथील विवाहित महिलेसह चार अल्पवयीन मुली शनिवारी बेपत्ता झाल्या. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून, त्यांच्या शाेधासाठी एक पथक मध्य प्रदेशकडे रवाना झाले आहे, तर दुसरे पथक सप्तशृंगी गडाकडे रवाना झाले आहे.
तोरखेडा येथे राहणारे ताराचंद ओगले हे पत्नीला माहेरी जाण्यासाठी तोरखेडा फाट्यावर पोहोचवायला गेले होते. त्या वेळी साेबत भाचीही होती. मध्य प्रदेशमधील गव्हाली (ता.सेंधवा, जि.बडवानी) येथे वैशालीचे माहेर आहे. ताराचंद ओगले यांनी त्यांना काली-पिलीत बसवले. त्यानंतर ते घरी परतले. घरी अाल्यावर दुसरी भाची मुलगी घरी दिसली नाही. तपास केल्यावर त्या बेपत्ता झाल्याचे कळले. त्याच वेळी गावातील एक १७ वर्षीय मुलगीही बेपत्ता झाली हाेती. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले. विवाहितेच्या माेबाइलवर संपर्क साधला असता ताे बंद येत हाेता. त्यामुळे पाचही जण गावातून बेपत्ता झाले. याप्रकरणी सारंगखेडा पाेिलसांत रविवारी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला अाहे.