आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झोक्याच्या फाशीने तान्हुल्याचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर - झोक्याच्या दोराची फाशी लागून धानवड (ता. जळगाव) येथील निखिल दुर्गेश पाटील या एक वर्षाच्या तान्हुल्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी 10 वाजेदरम्यान तळेगाव (ता. जामनेर) येथे घडली. तळेगाव येथे शिवाजी सुभाष पाटील या आपल्या भावाच्या लग्नासाठी धानवड येथून त्यांची बहीण आलेली होती. सकाळी निखिलची आई त्यास घरातील झोक्यात झोपवून हळदीच्या कार्यक्रमास गेली. या वेळी घरात कुणीही नव्हते. मुलगा झोक्याच्या खाली पडू नये म्हणून त्यास रुमालाने बांधलेले होते. वेगवान हालचालींमुळे निखिल पायाकडील बाजूने झोक्याच्या खाली आला; मात्र मधोमध बांधलेल्या रुमालाचा गळफास लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.