आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात कांद्याला सफरचंदाचा भाव; ग्राहक हैराण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- श्रीमंत लोकांचे खाणं म्हणून नेहमी सफरचंदाच्या नावाने बोटं मोडणार्‍या लोकांनी आता कांद्याचा धसका घेतला आहे. याचे कारणही तसेच आहे. सध्या सफरचंद स्वस्त आणि कांदा महाग झाल्याचे चित्र बाजारात निर्माण झाले आहे.

कांद्याचा दर वाढून मिळावा यासाठी शेतकर्‍यांना वेळोवेळी आंदोलन करावे लागत होते. ते करूनही 20 रुपये प्रति किलोच्यावर दर कधी मिळाला नाही. मात्र कांद्याचा आता हाच दर 50 ते 60 रुपये प्रतिकिलो झाला असून तो वाढत जाणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. जळगाव शहरात नाशिक आणि पुणे येथून दररोज 500 ते 700 टन कांदा घाऊक आणि किरकोळ विक्रीसाठी येतो. कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असले तरी त्याची हातोहात विक्री होते. याउलट सफरचंदाची आवक जेमतेम 50 ते 60 टन असूनही विक्रीसाठी तीन ते चार दिवसाची वाट बघावी लागते.