आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोनमुळे ऑनलाइन फ्रेंडसोबत चॅटिंग करणे झाले सोपे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- ऑनलाइन फ्रेंडसोबत हाय, हॅलो करायचे किंवा त्याच्यासोबत चार गोष्टी शेअर करणे आता अधिक सोपे झाले आहे. पूर्वी मित्नांशी गप्पा मारण्यासाठी युर्जस इंटरनेटवरून फेसबुक आणि ट्विटर सारख्या साइटवरून चॅटिंग करत होते. परंतु आता अनेक हायटेक स्मार्टफोन आल्यामुळे विविध अँप्स सहज डाउनलोड होतात. त्या माध्यमातून चॅटिंग करणे अधिक सोपे जाते. 99 रुपयांच्या इंटरनेट कॉर्डवर महिनाभर ऑनलाइन राहता येत आहे.

व्हॉटसअप : या मॅसेजिंग अँप्सवर विशेषत: युवक व्हिडिओ शेअरिग, फोटोसह चॅटिंग करू शकतात.
फीचर : हा अँप्स आयओएस, एंड्राइड विंडोज, सिंबीयन आणि ब्लॅकबेरी मोबाइलवर उपलब्ध आहे. या फीचरच्या माध्यमातून जलद मॅसेजिंग व्यतिरिक्त 5 जणांच्या ग्रुपमध्ये एकाच वेळी चॅटिंग केले जाऊ शकते. यामध्ये 15 ते 20 एमबीची फाइलदेखील शेअर केली जाऊ शकते.
वाइबर : मित्र देशात असो व परदेशात या माध्यमातून मोफत ऑनलाइन चॅटिंगचा पर्याय उपलब्ध आहे.
फीचर : वाइबरमध्ये 30 भाषांमध्ये ऑनलाइन चॅटिंग करू शकतात. जगभरात 195 देशांशी युर्जस जोडले जाऊ शकतात. फोटोसोबत मॅसेज पाठविणे आणि लोकेशन यातून शेअर केले जाऊ शकते.

लाइन : या सोशल मॅसेजिंग अँप्सचे शहरात युर्जस कमीच आहेत. हे लेटेस्ट अँप्स असल्याने त्याचा प्रसार झालेला नाही.
फीचर : यात मॅसेजसोबत बोलण्याचा पर्यायदेखील आहे. एंड्राईडसह सर्वच प्रचलित मोबाईलमध्ये हा अँप्स सहज प्ले होऊ शकतो. यात आपण फोटोला अनेक वेगवेगळ्या प्रकारत एडिट करू शकतो. मॅसेज पाठविल्यासोबतच तो वाचला किंवा नाही याचीदेखील माहिती मिळू शकते.
बीबी मॅसेंजर : मित्नांसोबत खासगीत चॅटिंग करण्यासाठी हा अँप्स फार उपयोगी आहे. या अँप्समधून केलेल्या चॅटिंगचा तपास लावणे आणि हँग करणे फारच कठीण आहे.
फीचर्स: एंड्राईड आणि आयओएस मोबाइलपेक्षा कमी क्षमतेच्या स्माटर्फोनमध्ये हे सॉप्टवेअर काम करू शकत नाही. बीबीएमच्या नव्या वर्जनमध्ये व्हाईस कॉल आणि व्हिडिओ कॉलची सुविधा उपलब्ध आहे.

चॅटऑन : इंटरनेटवर मित्नांशी चॅटिंग करण्यासाठी सॅगसंग कंपनीचा चॅटऑन अधिक पॉप्युलर होत आहे.
फीचर्स : यातून पाठविलेले मॅसेजला फेसबुकवर शेअर केले जाऊ शकते. त्याशिवाय हे अँप्स जॉइण्ड न करणार्‍या मित्नांनादेखील तुम्ही 140 शब्दांचा मॅसेज पाठवू शकतात. यात साधारणत: 64 भाषांमध्ये मॅसेज पाठविण्याची सुविधा आहे. यात चॅटिंगसह बोलण्याचीदेखील सुविधा उपलब्ध आहे. व्हिडिओ चॅटिंगची सुविधा चांगली आहे.
एफबी मॅसेंजर : फेसबुकने मोबाइल युर्जससाठी एफबी मॅसेंजर लाँच केले आहे. या अँप्सचे नवे वर्जन सुरू होणार आहे.
फीचर्स : एफबी मॅसेंजरच्या माध्यमातून चॅटिंग बिल्कुल नव्या स्टाइलने करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याचे स्ट्रिकर आणि आयकॉनला डाउनलोडिंग अत्यंत सोपे झाले आहे. मोबाईल कंपन्या या अँप्सला उपलब्ध करून देण्यावर भर देत आहेत.