आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Online Comics May Best Option For The Holiday Entertainment

मनोरंजनासाठी सुटीत ऑनलाइन कॉमिक्स ठरणार उत्तम पर्याय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना कॉमिक्स वाचणेही आवडते; पण त्यासाठी ऑनलाइन कॉमिक्स हादेखील चांगला पर्याय ठरू पाहत आहे. ऑनलाइन कॉमिक्समध्ये तुम्ही केवळ पाहू किंवा वाचनच करू शकत नाही, तर त्यांच्यासोबत खेळूही शकाल. ऑनलाइन कॉमिक्स आज मुलांना क्वीझ, व्हिडिओ गेम्स, कोडे, फन अँक्टिव्हिटीचेदेखील धडे देत आहे.

काही वर्षापूर्वीपर्यंत मुलांच्या मनोरंजनासाठी कॉमिक्स हे सर्वांत मुख्य साधन होते. कॉमिक्स पाहिल्याबरोबर त्याविषयी प्रचंड उत्सुकता मुलांमध्ये जागृत व्हायची. आजही कॉमिक्सविषयी मुलांचा कल कायम आहे. फक्त तंत्रज्ञानामुळे त्याचे स्वरूप बदलले आहे. सध्या कॉमिक्स वाचनानंतर मुले त्याच्याशी संबंधित क्वीझ, ऑनलाइन फ्री गेम्स, व्हिडिओ गेम्स, कोडे, कलरिंग पेज, वॉलपेपर आणि विविध प्रकारच्या फन अँक्टिव्हिटीसाठीही वेळ देतात. त्याचबरोबर मुलांसाठी कॉमिक्सच्या कॅरेक्टरशी संबंधित गेम्सची डीव्हीडीदेखील उपलब्ध आहे, ज्याचा आनंद उन्हाळ्याच्या सुटीत घेता येऊ शकेल.

कॉमिक्सबरोबरच गेम्सही

मुलांना सध्या केवळ कॉमिक्सच नकोय, तर त्याच्याबरोबरच त्याच्या कॅरेक्टर्सशी संबंधित गेम्सच्या डीव्हीडीही हव्या आहेत. याच कारणामुळे सध्या पॉप्युलर कॉमिक्स सिरीजसोबत केवळ कथाच नाही, तर त्या कथेशी संबंधित व्हीडीओ गेमची डीव्हीडी, स्टीकर्स व इतर अँक्सेसरिजही येत आहेत. दुसरीकडे टेक्नोफ्रेंडली मुलांना कॉमिक्सचे संकेतस्थळ (वेबसाइट) आपल्याकडे आकर्षित करीत आहे. टीव्हीवर कॉमिक्सचे कॅरेक्टर दाखविले जात असल्याने मुलांमध्ये कॉमिक्स वाचण्याची जिज्ञासा आणखी वाढली आहे. कॉमिक्सच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे सध्या त्याचा कागदच दर्जेदार असतो असे नाही, तर चित्रांचा दर्जाही खूपच चांगला असतो. त्यामुळे मुले कॉमिक्स वाचणे पसंत करतात.

चायनीज कॅरेक्टरही आवडीचे

एक जमाना होता जेव्हा मुले चाचा चौधरी, पिंकी आणि आर्चिससारखे कॉमिक्स आवडीने वाचत होते; परंतु सध्या याव्यतिरिक्त जापनीज आणि चायनीज थीमवर आधारित कॅरेक्टरच्या कॉमेडीच्या धर्तीवरील कॉमिक्सही अधिक पसंत केले जात आहेत. याव्यतिरिक्त अमर चित्रकथा मालिकाही अधिक पसंत केली जात आहे. मुलांमध्ये सध्या छोटा भीमच्या काटरूनचीच जादू नाही तर त्याचे कॉमिक्सही आवडीने वाचले जात आहेत.
कॉमिक्सची संकेतस्थळे

www.graphicindia.com, www.liquidcomic.com, www.asterix.com, www.marvel.com, www.archiecomics.com, www.diamondcomic.com, www.garfield.com, www.tincleonline.com, www.tintin.com


कॉमिक्ससाठी उपलब्ध संकेतस्थळे

टेक्नोफ्रेंडली मुले सध्या ऑनलाइन कॉमिक्स वाचणे अधिक पसंत करीत आहेत. सध्या अनेक डिजिटल कॉमिक्स आहेत, ज्यांचे स्क्रीनवर अधिक चांगल्या प्रकारे वाचन करता येते. बरीच मुले संकेतस्थळांवर कॉमिक्सचे वाचन करतात आणि जेव्हा एखादी कॉमिक्स मालिका चांगली वाटते तेव्हा तिचे कॉमिक्सच्या रूपाने वाचनही होते. कॉमिक्ससाठी काही चांगली संकेतस्थळे असे असतात जे खूप प्रसिद्ध आहेत.