आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जाचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक, चोरट्यांचा नवा फंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एटीएमचा सिक्युरिटी पासवर्डद्वारे फसवणूक करण्याचा फंडा मागे पडला असून आता कर्जाचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणुकीचा नवीन फंडा फोफावला आहे. त्याला बळी पडणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. फोन करून ग्राहकांकडून बँकेचा पासवर्ड जाणून घेत फसवणूक झाल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.

अशी होतेय फसवणूक
शून्यक्रमांकाने सुरू होणाऱ्या मोबाइल नंबरवरून ग्राहकांना दोन ते १० लाखांपर्यंत तुम्हाला कर्ज मंजूर झाले आहे. त्यावर फक्त दोन टक्के व्याजदर आकारणी होणार आहे, असे फोन केले जात आहेत. यासाठी संबंधित नागरिकांकडून व्यक्तिगत माहिती घेऊन संबंधिताना दोन दिवसांनी पुन्हा फोन करून तुम्हाला अगोदर ऑनलाइन तीन ते पाच हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगून कुणाच्याही आमिषाला बळी पडू नये. तसेच खात्री केल्यानंतरच व्यवहार करावा, असे आवाहन बँकांनी केले आहे.

केस : ४१४५० रुपये भरले
बांधकामावरसेंट्रिंग काम करणाऱ्या शांताराम मिस्तरी यांना असाच धरमपाल शर्मा यांचा मुंबईहून फोन आला होता. तुम्हाला दोन लाखांचे व्यक्तिगत कर्ज दोन टक्के व्याजाने दिले जाणार आहे. यासाठी तीन हजार रुपये सुरुवातीला भरा. ते शांताराम यांनी भरलेदेखील. वारंवार वेगवेगळी कारणे पुढे करून शर्माने शांताराम यांच्याकडून ४१ हजार ४५० रुपये ऑनलाइन भरण्यास भाग पाडले. मात्र, त्या उपरही कर्जाची रक्कम मिळत नसल्याचे शांताराम यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी उप पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. ०७५३२९८१७९३ क्रमांकावरून शांताराम यांना अजूनही फोन सुरू आहेत.

बँक पासवर्ड मागत नाही
-बँककोणत्याच ग्राहकांकडून पासवर्ड मागत नाही. बँकेचे काहीही काम असल्यास संबंधितांना बँकेत बोलावले जाते. त्यामुळे बँकेचे नाव पुढे करून पासवर्ड मागणाऱ्या कुणालाच पासवर्ड देऊ नये. यासंदर्भात तक्रारी असल्यास १८००४२५३८०० या क्रमांकाशी संपर्क साधावा. विवेकशाह, सहायक महाव्यवस्थापक, स्टेट बँक