आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीत दररोज अडीच कोटींची आॅनलाइन खरेदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मेट्राेपाॅलिटीन शहरांनंतर जळगाव शहरात झपाट्याने विस्तारलेल्या ई-शाॅपिंगला दिवाळीत भरभरून प्रतिसाद मिळत अाहे. ई-काॅमर्स कंपन्यांनी दिलेल्या फेस्टिव्हल अाॅफर्समुळे कंपन्यांची देखील दिवाळी हाेत अाहे. शहरात अाधीच रुजलेल्या अाॅनलाइन शाॅपिंग व्यवसायात अाॅफर्सच्या फटाक्यांनी दुपटीने वाढ झाली अाहे. या अाठवड्यात कंपन्यांकडे दरराेज अडीच काेटी रुपयांच्या अाॅनलाइन अाॅर्डर पडत अाहेत. अाॅनलाइन खरेदीत अाॅफर्स अाणि निवडीचा पर्याय असल्याने चाेखंदळ जळगावकरांचा कॅश अाॅन डिलेव्हरीकडे कल अाहे. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद बघता दाेन माेठ्या कंपन्यांनी शहरातच डिलेव्हरी स्टेशन सुरू केले अाहेत.
शहरात अाॅनलाइन खरेदीबाबत गेल्या तीन वर्षांत माेठी वाढ झाली अाहे. अाॅनलाइन बाजारातील विविध कंपन्यांचे जवळपास हजार पार्सल जळगाव शहरात येतात. जळगाव, भुसावळ, वरणगाव या शहरांमध्ये ई-काॅर्मसवर सर्वाधिक अाॅर्डर दिल्या जातात. फ्लिपकार्ड या अाॅनलाइन शाॅपिंग साइडवर येणाऱ्या अाॅर्डरपैकी ४५ टक्के अाॅर्डर भुसावळ, वरणगाव या दाेन शहरातील तर ५५ टक्के जळगाव शहरातील असतात. जळगाव शहरातील प्रतिसाद वाढल्याने अॅमेझाॅन या कंपनीने देखील एमअायडीसीमध्ये स्वत:ची पॅकेजिंग अाणि वितरण व्यवस्था केली अाहे. दरराेज एक हजार पार्सलचा अाकडा दिवाळीच्या काळात ते अडीच हजारांवर गेला अाहे.

अाॅफर्सला प्रतिसाद
अाॅनलाइन मार्केटमध्ये निवडीला विविध पर्याय असले तरी ९५ टक्के ग्राहक अाॅफर्सच्या शाेधात असतात. कंपनीकडे येणाऱ्या अाॅर्डरपैकी ९५ टक्के अाॅर्डर या अाॅफर्सशी संबंधित तर केवळ टक्के ग्राहकांकडून नियमित अाॅर्डर दिल्या जातात. शहरातील अाॅर्डरमध्ये बहुतांश अाॅर्डर कॅश अाॅन डिलेव्हरी असल्याची माहिती एका कंपनीच्या प्रतिनिधीने दिली.

निवडीचे पर्याय, वेळेची बचत
अाॅनलाइन खरेदीमुळे वेळेची बचत हाेते. कमी वेळेत अधिकाधिक पर्याय बघून त्यातील हवा ताे पर्याय निवडून खरेदी करता येते. नेहमीच्या मार्केटमधील गर्दीमुळे वस्तूंबद्दल पुरेशी माहिती मिळत नाही. अाॅनलाइन खरेदीमध्ये निवडीचा पर्याय, वस्तूंवर असलेली अाॅफर्स, किंमत यासंदर्भात स्पष्टपणे माहिती असते. बजेटनुसार वस्तू निवड केली जाऊ शकते. शिवाय वस्तू मिळाल्यानंतर पैसे देण्याचाही पर्याय असल्याने ग्राहकांचा कल वाढल्याचे कंपनी प्रतिनिधीने सांगितले.

अाॅनलाइन खरेदी करताना ही घ्या काळजी
^अाॅनलाइन खरेदीकरीत असलेली साइट फसवी नसल्याची खात्री करावी. क्रेडीट, डेबिट कार्डद्वारे खरेदी करणे टाळावे. ज्या अाॅफर्सच्या अाधारे ग्राहक वस्तू खरेदी करणार अाहेत. त्या वस्तूंसंदर्भात अाॅर्डर दिल्यानंतर ई-मेल येताे. अाॅफर्सचा पुरावा, ई-मेल, वस्तूंचे पक्के बिल अाणि वस्तूंचे वारंटी कार्ड सांभाळून ठेवले पाहिजे. ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्याला न्याय मिळवण्यासाठी ग्राहक मंचामध्ये या गाेष्टीची अावश्यकता असते. माेबाइलसंदर्भात सर्वाधिक तक्रारी येत असल्याने ग्राहकांनी विशेष काळजी घ्यावी. अॅड.हेमंत भंगाळे, ग्राहक कायदेतज्ज्ञ.
बातम्या आणखी आहेत...