आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तातडीचे दहा हजार रुपये फक्त पन्नास शेतकऱ्यांच्याच पदरात, धुळे जिल्‍ह्यातील स्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - तातडीची मदत म्हणून शासनाने शेतकऱ्यांना १० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयी बँकांना आदेश देण्यात आले असून, या योजनेंतर्गत जिल्हा बँकेतून २५ तर राष्ट्रीयीकृत बँकेतून २६ शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे जिल्हा बँकेने तोटा सहन करून १० हजार रुपयांची रक्कम देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानंतरही या योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी जिल्हा बँकेसमोर आंदोलन करत आहे. 
 
शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी १० हजार रुपये देण्याचे ठरवले. शासन हमीवर ही रक्कम देण्याचे आदेश बँकांना देण्यात आले. ही रक्कम पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांना हमीपत्र भरून देणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा बँकेने धुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये ४० हजार हमीपत्रांचे वाटप केले. जिल्हा बँकेचे ३८ हजार सभासद शेतकरी १० हजार रुपयांच्या मदतीसाठी पात्र आहेत. त्यानुसार जिल्हा बँकेला ३८ कोटी रुपये शिखर बँकेकडून उपलब्ध झाले आहे. ही रक्कम जिल्हा बँकेला ९.५० टक्के दराने मिळाली आहे.

 
शेतकऱ्यांना सात ते अाठ टक्के दराने कर्ज वितरण होणार आहे. या रकमेतून शिखर बँकेला पाच टक्के व्याज जिल्हा बँकेला द्यावे लागणार तर उर्वरित साडेचार टक्के व्याजाचा परतावा शासनाकडून शिखर बँकेला दिला जाणार आहे. या प्रक्रियेत जिल्हा बँक प्रशासनाला तोटा सहन करावा लागणार अाहे. त्यानंतरही बँकेने शेतकऱ्यांना १० हजार रुपये देण्याची तयारी केली आहे. मात्र जिल्ह्यातील केवळ २५ शेतकऱ्यांनीच हमीपत्र दिल्याने या शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमधून ३० शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात दोन मंत्री असतानाही शासनाच्या या योजनेला जिल्ह्यात फारसा प्रतिसाद नाही. 
 
शेतकऱ्यांना१० हजार रुपये तातडीने देण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात राजकीय पक्षांनी आंदोलने सुरू केली असून, वातावरण तापले अाहे. जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने भाजप आंदोलनामध्ये आघाडीवर असल्याचे चित्र आहे. 
बातम्या आणखी आहेत...