आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Only Two Of The Complaints Received By The Eligible Depositors Of The NMC 138

138 ठेवीदारांच्या तक्रारी पैकी महापालिकेत केवळ दोनच तक्रारी पात्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी पालिकेत लोकशाही दिन घेण्यात येतो. नागरिकांना आपल्या विविध तक्रारी या ठिकाणी दाखल करता येतात; मात्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार 15 दिवस अगोदर तक्रारी सादर केलेल्यांची लोकशाही दिनात दखल घेण्यात येणार असल्याची अट टाकण्यात आल्याने केवळ दोनच व्यक्ती यासाठी पात्र ठरल्या आहेत.
पालिकेच्या दुसर्‍या मजल्यावरील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यात उपायुक्त प्रदीप जगताप, जनसंपर्क अधिकारी दिलीप सूर्यवंशी, सहायक जनसंपर्क अधिकारी कैलास पठारे, शहर अभियंता सुनील भोळे, पाणीपुरवठा विभाग प्रमुख डी.एस.खडके, सहायक नगररचनाकार अविनाश भोसले यांच्यासह चारही प्रभाग अधिकारी उपस्थित होते.
सकाळी 10 ते 1 या वेळेत झालेल्या लोकशाही दिनात नवीन नियमानुसार 15 दिवसांपूर्वी तक्रार सादर करणार्‍यांचीच दखल घेण्यात आली. त्यामुळे गिरीश शंकर कुलकर्णी यांची आणि दत्तू रामा सोनवणे अशा दोघांचीच अनधिकृत बांधकाम आणि नगररचनासंदर्भात तक्रार स्वीकारण्यात आली. या दोन्ही तक्रारी संबंधित विभागापर्यंत हस्तांतरित करण्यात आल्या असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.