आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र केसरी विजय चाैधरीच्या पंज्यावर शस्त्रक्रिया, डाॅक्टरांकडून तीन महिने विश्रांतीचा सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - महाराष्ट्र केसरीचा सलग दुहेरी किताब पटकावणाऱ्या विजय चाैधरीच्या उजव्या पायाच्या पंजावर गुरुवारी मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात अाली. डाॅ.अानंद जाेशी यांच्या हाॅस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात अाली. त्याला तीन महिने विश्रांतीचा सल्ला दिला अाहे.
नागपूर येथे रविवारी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजय चाैधरीने सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. स्पर्धेपूर्वीच त्याच्या पंजाला वेदना हाेत हाेत्या. स्पर्धा झाल्यावर बुधवारी डाॅ.अानंद जाेशी यांच्याकडे वैद्यकीय चाचण्या केल्या. त्यानंतर पंज्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डाॅ. जाेशी यांनी घेतला.

कुटुंबीय सायगावीच
विजयवरशस्त्रक्रिया झाली तेव्हा कुटुंबातील काेणीही सदस्य साेबत नव्हता. प्रशिक्षक राेहित पटेल यांनी मुंबईला येऊ नका, असे सांगितले. त्यामुळे अाम्ही घरीच हाेताे, असे त्याचे वडील तथा पहिलवान नथ्थू चाैधरी यांनी सांगितले.