आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माय एफएममध्ये आरजे होण्याची तरुणांना संधी; आैरंगाबाद येथे आज दिवसभर हाेणार मुलाखती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद​/जळगाव- भारतातील अग्रगण्य रेडिओ माय एफएममध्ये आपल्यालाही रेडिओ जॉकी (आरजे) होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींची जाणीव संवाद कौशल्य असणाऱ्या २० ते २७ वयोगटातील तरुणांना आरजे पदासाठी संधी दिली जाणार आहे. जळगाव आणि आैरंगाबाद केंद्रासाठी शनिवार,दि.२५ नोव्हेंबर रोजी आैरंगाबाद येथे आरजे पदासाठी मुलाखती अायोजित करण्यात अाल्या आहेत. 


मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व असलेल्या तरुणांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत कार्यक्रम सादर करण्याची,श्रोत्यांशी संवाद साधण्याची या रेडिओव्दारे संधी मिळणार आहे. आपल्यामधील निवेदनाची कला रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे रेडिओ हे उत्तम साधन आणि व्यासपीठ आहे.रेडिओ जनमानसाच्या जिव्हाळ्याचे, सगळ्यांच्या मनाच्या खूप जवळ असणारे माध्यम आहे. या माध्यमातून केवळ बोलण्यातून चित्र उभे करण्याची कला आपल्याला अवगत असेल तर मग ती लपवून ठेवता अापल्यामधील सुप्तगुणांना वाव देण्याची ही संधी आहे.या मुलाखती शनिवार,दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून सायंकाळी वाजेपर्यंत होणार आहेत. त्यासाठी औरंगाबादच्या माय एफएम स्टुडिओमध्ये उपस्थित रहावे लागणार आहे. मुलाखतीसाठी पहिला मजला काकडे टॉवर, एस. बी. एच कॉलनी, मोर मेगा स्टोर जवळ,शाहनूर मियाँ दर्गा रोड, अौरंगाबाद या पत्त्यावर आपला बायोडाटा, जन्म प्रमाणपत्र फोटो सोबत घेऊन इच्छुकांनी हजर रहावे, असे आवाहन माय एफएम तर्फे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...