आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी रद्द करण्यास विराेध, राज्यभरातील महापालिका कर्मचाऱ्यांचे २८ला अांदाेलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पालिकांतर्फे वसूल केला जाणारा एलबीटी रद्द करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू अाहेत. मात्र, या करातून विकासकामे अाणि कर्मचाऱ्यांचे वेतन केले जाते. एलबीटी रद्द झाल्यास शहराच्या विकासावर परिणाम हाेऊन कर्मचाऱ्यांच्या वेतनाचीही अडचण निर्माण हाेईल. त्यामुळे हा कर रद्द करू नये, या मागणीसाठी पालिका कर्मचाऱ्यांतर्फे मंगळवारी पालिकेसमाेर अांदाेलन करण्यात येणार अाहे.

महापालिकेतर्फे जकात वसूल केली जात हाेती त्यातून विकासकामे करण्यात येत हाेती. तसेच कामगारांचे वेतन, भत्ते इतर सुविधा वेळेवर पुरवल्या जात हाेत्या. मात्र, जकात रद्द करून लागू केलेला एलबीटीही रद्द करण्याच्या हालचाली सुरू अाहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था अडचणीत येतील. अाॅगस्टपासून एलबीटी रद्द झाल्यास अार्थिक परिस्थिती अजून बिकट हाेऊन कामगारांना वेळेवर वेतन मिळणार नाही. या बाबींचा विचार करून राज्यातील सर्व महापालिका नगरपालिका कर्मचारी संघटना फेडरेशनतर्फे २८ एप्रिल राेजी सकाळी ११ ते दुपारी वाजेपर्यंत पालिकांसमाेर अांदाेलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शिखर संघटनेच्या निर्देशानुसार जळगाव महापालिका कामगार संघातर्फे यासह विविध मागण्यांसाठी अांदाेलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष पी.जी.पाटील, जनरल सेक्रेटरी सुभाष मराठे, सचिव पी.के.पवार जाॅइंट सेक्रेटरी जगदीश भावसार यांनी कळवले अाहे.

अशा अाहेत मागण्या
>काेणत्याही परिस्थितीत एलबीटी जकात रद्द करण्यात येऊ नये.
> भरतीवरील निर्बंध उठवून रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत.
> अनुकंपा-वारसा तत्त्वानुसार पात्रता यादीत असलेल्यांची भरती सुरू करावी.
> राेजंदारी, कंत्राटी हंगामी कर्मचाऱ्यांना ‘कायम कामगार’ म्हणून घेण्यात यावे.
> लाड पागे समितीच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात.
> नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्यांप्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन लागू करावे.