आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैलास सोनवणे यांना नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांना नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याचे आदेश करण्यात आले आहेत. त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर शहरातील डॉक्टर अथवा चार्टर्ड अकाऊंटंट यांना संधी दिली जाणार आहे. यामागे खाविआने प्रोफेशनल लोकांना जोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. 
 
महापालिकेच्या विविध पदांची जबाबदारी सांभाळलेले कैलास सोनवणे हे गेल्या चार वर्षापासून स्वीकृत सदस्य म्हणून काम पाहत आहेत. दोन दिवसांपूर्वीच खाविआचे अध्यक्ष रमेश जैन यांनी सोनवणेंना नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याची सूचना केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात ते पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, सोनवणेंसोबत जितेंद्र मुंदडा यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे; परंतु मुंदडा हे वर्षभरापूर्वीच स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात आले असून जुने कार्यकर्ते असल्याने त्यांना राजीनामा देण्याबाबत कोणताही निरोप देण्यात आलेला नाही. दरम्यान, सोनवणेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर शहरातील अभ्यासू डॉक्टर अथवा चार्टर्ड अकाऊंटंट यांना स्वीकृत सदस्य म्हणून उर्वरित काळासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. दहा महिन्यांनी महापालिकेची निवडणुक असल्याने नविन लोकांना पक्षाशी जोडण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...