आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Organisational Changes In Maharashtra Navnirman Sena

‘मनसे’च्या संघटनात्मक रचनेत फेरबदल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज्यभरात संघटनात्मक फेरबदलाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. विधानसभा क्षेत्रनिहाय जिल्हाध्यक्षपदाची पदे कमी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील दोन जिल्हाध्यक्षांपैकी ललित कोल्हे यांची निवड निश्चित असून दुसर्‍या जिल्हाध्यक्षपदासाठी किरण शेलार व सुरेश पाटील यांच्यातून एक नाव निश्चित होणार आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुका समोर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज्यभरात संघटनात्मक फेरबदल के ले जात आहेत. जळगाव जिल्ह्यातही याच पद्धतीने बदल होत असून पाच जिल्हाध्यक्षांची पदे व जुनी कार्यकारिणी बरखास्त झाली आहे. नवीन कार्यकारिणी देताना लोकसभा क्षेत्रनिहाय दोनच जिल्हाध्यक्ष राहणार आहेत. नवीन कार्यकारिणीत काही नवीन चेहर्‍यांना तर काही जुन्या मंडळींना सहभागी करून घेतले जाणार आहे. बरखास्त केलेल्या तालुका कार्यकारिणीच्या ठिकाणी नवीन नियुक्त्यांसह दोन जिल्हाध्यक्षांची घोषणा मंगळवारपर्यंत होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.

महत्त्वाची पदे विसर्जित
पक्षात जिल्हा संघटक असे पद होते. सद्या ही जबाबदारी राजेंद्र पाटील यांच्याकडे होती. जिल्हा सरचिटणीसची दोन पदे होती. यात किरण शेलार यांच्याकडे जबाबदारी होती. तर दुसरी जागा रिक्त होती. नवीन रचनेनुसार पदे विसर्जित करून त्या ऐवजी दोन जिल्हासचिव व तालुकासचिव पदे निर्माण झाली आहेत.