आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोवाड्यातून वर्णिला संभाजीराजांचा महिमा, लोककला, शाहिरीतील प्रकार सादर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; ‘तोशूरवीर संभाजीराजा’ म्हणत संभाजी महाराजांच्या महिमेचे वर्णन करीत त्यांचा इतिहास शाहीर रामानंद उगले यांनी आपल्या कणखर आवाजात पोवाड्याने सांगत उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले.

अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेतर्फे शाहीर अमर शेख यांच्या जयंती कार्यक्रमाचा बुधवारी नूतन मराठा महाविद्यालयात समारोप झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नूतन मराठा महाविद्यालय संस्थेचे संचालक अॅड.विजय पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्या गीतांजली ठाकरे, शाहीर परिषदेच्या समन्वयिका वैशाली पाटील उपस्थित होते.
या वेळी शाहीर अमर शेख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक शाहीर परिषदेचे राज्याध्यक्ष विनोद ढगे यांनी केले. जालना येथील प्रसिद्ध शाहीर रामानंद उगले यांनी आपल्या अननोख्या शैलीत कार्यक्रमाचे सादरीकरण करीत उपस्थितांना पोवाड्यांची मेजवानी दिली. १४ जणांच्या समूहानेसुद्धा साथसंगत केली. यासाठी सचिन महाजन, ललित वाघ, देवश्री खंबायत, गौरव चचोपडे, सतीश पाटील तसेच नूतन मराठा महाविद्यालयाचे सहकार्य मिळाले. प्रा.राजेंद्र देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.सुनील गरुड यांनी आभार मानले.

महाराष्ट्राच्या गौरवशाली "जय जय महाराष्ट्र माझा' पोवाडा, "गणराया ताराया यावे धावुनी' हे गण, "आई भवानी तुझ्या कृपेने' हा गोंधळ, जागरण सादर करण्यात आले. तसेच फटका प्रकारात सामाजिक विडंबनदेखील करण्यात आले. यात वेगवेगळ्या विषयांवर विननोदी ढंगात सादरीकरण करण्यात आले. तसेच संभाजींचे वर्णन करणाऱ्या संभाजींच्या पोवाड्याने समारोप करण्यात आला. या वेळी शाहिरी लोककलेतील पारंपरिक अनेक प्रकार सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली.