आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Other State Peope Beat Chalisgaon Youngster In Railway

चाळीसगावच्या तरुणाला परप्रांतीयांनी रेल्वेतून फेकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर - पठाणकोट एक्स्प्रेसने चाळीसगावहून रावेरकडे येणार्‍या तरुणाला परप्रांतीयांनी बेदम मारहाण केली. जखमी झालेल्या तरुणास रावेर स्थानकावर मदत मिळाली नाही. यामुळे परप्रांतीयांनी त्याला पुन्हा फरफटत डब्यात नेले. मरेपर्यंत मारहाण केली. त्यानंतर खानापूर पुढील रेल्वे लाइनवर त्याचा मृतदेह फेकून दिल्याची घटना गुरुवारी घडली.

चाळीसगाव येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार नरेश तुकाराम सोनार (वय 35) हे पठाणकोट एक्स्प्रेसने सकाळी रावेरकडे निघाले. पाल (ता.रावेर) येथील वनरक्षक मेहुणी वंदना विसपुते यांच्याकडे थांबलेल्या पत्नीला घेण्यासाठी ते निघाले होते. प्रवासादरम्यान जनरल बोगीत जागेवरून किरकोळ वाद झाले. मात्र, हा वाद विकोपाला जाऊन परप्रांतीय तरुण हे नरेशवर तुटून पडले. भुसावळ ते रावेरदरम्यान त्यांनी त्याला प्रचंड मारहाण केली. या मुळे रावेर स्थानक येताच अर्धमेल्या अवस्थेतील नरेशने जिव वाचवण्यासाठी स्टेशन मास्तरकडे धाव घेतली. मात्र, स्टेशन मास्तर आर. के. सिंग याने कोणतीही दयामाया दाखवली नाही.

आरपीएफ नावालाच
रावेर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाचा कर्मचारी नियुक्तीवर असतो. मात्र, घटना घडली तेव्हा, हा कर्मचारी ठिकाणावर नव्हता. कर्तव्याकडे दुर्लक्ष करणार्‍या या कर्मचार्‍यावर कारवाईची मागणी पुढे आली आहे.

माणुसकी हरवली?
रावेर रेल्वे स्थानकावर सकाळी बोटावर मोजण्याएवढे लोक हजर होते. मात्र, हा प्रकार घडत असताना कुणीही प्रतिकार केला नाही. मदत मिळाली असती तर नरेशचा जीव वाचला असता. मदतीसाठी कुणीही पुढे न आल्याने माणुसकी हरवली की, काय? असा प्रश्न उपस्थित झाला.

व्हिजिटिंग कार्ड फेकले
रेल्वे थांबली असताना रावेरमध्ये नरेशने सुटकेचा प्रयत्न केला. मात्र, परप्रांतीयांच्या टोळक्याने मारहाण करून त्याला बळजबरीने गाडीत बसवले. या वेळी त्याने खिशातून स्वत:चे व्हिजिटिंग कार्ड फेकली. यावरून तो नरेश सोनार असल्याचे समजले.