आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • OTS Issue In Jalgaon City Corporation Wright Letter To Maharashtra Government

ओटीएसवर निर्णयासाठी महापालिकेचे हुडकोसह राज्य शासनाला पत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पालिकेची खाती सीलप्रकरणी दाखल याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. हुडकोकडून सहकार्य होत नसल्याने पालिकेने हुडको राज्य शासनाला पत्र पाठवून बैठक घेण्याची मागणी केली आहे.
हुडकोचा हप्ता कमी करून मिळण्याच्या मुद्दयावर सुनावणी होणार होती मात्र, मंगळवारी ही केस बोर्डावर आल्याने सुनावणी बुधवारी होणार आहे. तथापि, याप्रकरणी हुडकोकडून सहकार्य मिळत नसल्याने पालिकेने मंगळवारी मंत्रालयातील नगरविकास विभाग हुडकोला फॅक्स करून पत्र पाठवले. त्यात मुंबई उच्च न्यायालयाने ज्याप्रमाणे महापालिकेला कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत, तसेच हुडकोने ओटीएससंदर्भात पालिकेशी पत्रव्यवहार करायचा होता. मात्र, हुडकोने एकही प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्रालयातील प्रमुख अधिकारी, हुडको पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी तारीख कळवावी. त्या बैठकीत जो निर्णय होईल त्यानंतरच्या आठवड्यात कोर्टाची तारीख घ्यावी, असेही स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. बुधवारी या पत्राची प्रत उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.