आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमविच्या सहाव्या कुलगुरूपदी प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांची निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून प्रा.डॉ.पी.पी.पाटील यांची निवड मंगळवारी जाहीर करण्यात आली. राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांनी ही घोषणा केली. विद्यापीठामध्ये २५ वर्षापासून काम करणाऱ्या पाटील यांना सहाव्या कुलगुरूंचा बहुमान मिळाला. ते विद्यापीठाच्या स्कूल आॅफ फिजिकल सायन्सेसमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी दुपारी ११ वाजता ते कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरूपदाच्या उमेदवारांच्या मुलाखती २० ऑक्टोबर रोजी घेतल्या होत्या. त्यामध्ये प्रा.डॉ. पी.पी.पाटील, प्रा.आर.डी.कुलकर्णी, प्रा.डी.जी.हुंडीवाले, प्रा.ए.एम.महाजन यांचा समावेश होता. निवडीसाठी पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश एल. नरसिम्हा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती गठित केली होती. या समितीमध्ये आयआयटी दिल्लीचे संचालक प्रो.व्ही.रामगोपाल राव तसेच राज्य शासनाच्या उच्च तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांचा समावेश होता. प्रा. पाटील यांना मंगळवारी दुपारी ३.४५ वाजता राजभवनातून फोन आला. राज्यपालांच्या सचिवांनी प्रा. पाटील यांना शुभेच्छा देत आपली कुलगुरूपदी निवड झाली असल्याची माहिती दिली. त्यानंतर रेड्डी यांचा ई-मेल प्राप्त झाला. प्रा. पी.पी.पाटील हे उमविचे सहावे कुलगुरू ठरले आहे. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा राहणार आहे. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे सद्या प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार आहे. प्रा. पाटील बुधवारी त्यांंच्याकडून पदभार स्वीकारणार अाहेत. त्यानिमित्त सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात स्वागताचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती कुलसचिव प्रा.ए.एम.महाजन यांनी दिली.

शुभेच्छांचा वर्षाव
प्रा.पाटील यांची निवड होताच विद्यापीठ परिसरातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली. त्यांच्या फिजिकल सायन्सेस विभागातील विद्यार्थी प्राध्यापकांनीही शुभेच्छा दिल्या. कुलसचिव डॉ. ए. एम. महाजन यांनीदेखील प्रा. पाटील यांची भेट घेत अभिनंदन केले. दरम्यान, कुलगुरूपदाच्या शर्यतीत विद्यापीठातीलच चार प्राध्यापक होते. त्यामुळे विद्यापीठातीलच कुलगुरू मिळणार, हे अगोदरच स्पष्ट झाले होते.

आज घेणार पदभार
Âपाटीलमूळचे अंजाळे (ता. यावल) येथील रहिवासी आहेत.
 उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कारासोबत विविध पुरस्काराने सन्मानित
 विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या हस्ते आज घेणार पदभार
बातम्या आणखी आहेत...