आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामा मशिदीचे मौलाना हाफीज अनिस कहाकर यांची दाढी ओढल्यामुळे पाचोरा शहरात संताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोरा - शहरातील कृष्णापुरी भागातून पायदळी जात असताना अज्ञात इसमाने शहरातील जामा मशिदीचे मौलाना हाफीज अनिस कहाकर यांची दाढी ओढल्याने तणाव निर्माण झाला. याप्रकरणी अज्ञात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कहाकर हे मुळचे तालुक्यातील वरखेडी-भोकरी येथील रहिवासी आहेत. ते दररोज अपडाऊन करतात. दुपारी दोन वाजता ते मशिदीकडे जात असताना हा प्रकार घडला. संशयित आरोपीने मनोज पाटील नाव सांगितले. त्यानंतर आपण रस्त्यावरील इतरांना ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने धूम ठोकली असल्याचे फिर्यादी कहाकर यांनी सांगितले. पोलिसांनी त्यानंतर कृष्णापुरी भागातील मनोज पाटील नामक तीन जणांना चौकशीसाठी पोलिस स्टेशनला आणले. मात्र ओळख पटली नाही. संशयिताने मुद्दाम खोटे नाव सांगितल्याचे स्पष्ट झाले.

शांतता कमिटीची बैठक
याप्रकारानंतर पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश गावित, निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील, जामनेरचे पोलिस निरीक्षक शेख पोलिस स्टेशनमध्ये आले. त्यांनी दोन्ही समूहाच्या लोकांना शांततेचे आवाहन केले. जळगावहून दंगा नियंत्रण पथक तसेच जामनेर, कासोदा, एरंडोल येथून अधिक पोलिक कुमक मागविण्यात आली.