आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pachora Jamaner Railway Link Ajantha Caves Raksha Khadse

पाचाेरा- जामनेर रेल्वे अजिंठा लेणीला जाेडणार - खासदार रक्षा खडसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पाचाेरा-जामनेरही एेतिहासिक पीजे रेल्वे अजिंठा लेणी अाणि बाेदवड रेल्वेस्थानकाला जाेडली जाणार अाहे. या संदर्भातील सर्वेक्षणाला केंद्राकडून मंजुरी मिळाली अाहे. सर्वेक्षणानंतर अहवाल प्राप्त झाल्यावर रेल्वेचे विस्तारीकरण अाणि नूतनीकरण केले जाणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी बाेलताना दिली.
इंग्रजांनी १९१८ मध्ये पाचाेरा-पहूर अाणि १९२५ मध्ये पहूर ते जामनेरदरम्यान नॅराे गेज रेल्वे सुरू केली हाेती. अद्यापही याच मार्गावर ही रेल्वे सुरू असताना जामनेर-पाचाेऱ्यादरम्यान प्रवासी वाहतूक केली जाते. अजिंठा लेणीपर्यंत या रेल्वेचा विस्तार करण्याचा विषय यापूर्वींही लाेकसभेत मांडण्यात अाला हाेता. दुसऱ्यांना या रेल्वेच्या सर्वेक्षणास मंजुरी मिळाली अाहे. जामनेर ते पाचाेऱlदरम्यान रेल्वेचे ब्राॅड गेजमध्ये विस्तारीकरण करण्यास अडचणी नाही. इंग्रज काळात रेल्वेसाठी संपादित केलेल्या जमिनीवर रेल्वेचे विस्तारीकरण शक्य अाहे. दरम्यान, पहूर ते अजिंठा लेणी अाणि जामनेर ते बाेदवडदरम्यान रेल्वेट्रॅक विस्तारीकरणासाठी हे सर्वेक्षण केले जाणार अाहे.
१६ हजार काेटींच्या कामांचे गडकरी करणार उद्घाटन
जळगाव केंद्रातभाजपचे सरकार अाल्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जळगाव जिल्ह्यासाठी तब्बल १६ हजार काेटी रुपयांची कामे मंजूर केली अाहेत. जिल्ह्यातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ही कामे महत्त्वपूर्ण असणार अाहेत. या कामांचा शुभारंभ करण्यासाठी स्वत: केंद्रीय मंत्री गडकरी येत्या २५ जानेवारी राेजी जिल्ह्यात येणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी भाजप कार्यालयात अायाेजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, केंद्राने देशात तीन प्लास्टिक पार्कला मंजुरी दिली अाहे. त्यातील एक जळगाव जिल्ह्यात हाेणार असल्याचे सांगण्यात अाले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६चे चाैपदरीकरण, अाैरंगाबाद- पहूर-जामनेर-मुक्ताईनगर- बऱ्हाणपूर- इंदूर नवीन महामार्ग, पहूर-जळगाव चाैपदरीकरण, जळगाव शहरातील समांतर रस्ते, उड्डाणपूल, पाराेळा, वरणगाव, मुक्ताईनगर येथे बायपास, बऱ्हाणपूर-रावेर- चाेपडा -शिरपूर रस्ता यासह जिल्ह्यातील इतर रस्त्यांसाठी केंद्राकडून गेल्या दीड वर्षात १६ हजार ५८२ काेटी रुपयांची कामे मंजूर केली अाहे. येत्या तीन ते चार वर्षांत ही संपूर्ण कामे पूर्ण हाेतील. शहरातील सागर पार्क येथे २५ जानेवारी राेजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत जाहीर सभा हाेणार अाहे. जिल्ह्यातील सर्व विकासकामांचे एकाच ठिकाणी उद्घाटन करण्यात येणार अाहे. या सभेसाठी १० हजार कार्यकर्ते येणार असल्याची माहिती देण्यात अाली. जिल्ह्यासाठी मंजूर झालेला प्लास्टिक पार्क भुसावळला हाेणार असल्याचे खडसे यांनी सांगितले, तर हा पार्क जळगावमध्ये हाेणार असल्याचा दावा याचवेळी खासदार ए.टी.पाटील यांनी केला. पत्रकार परिषदेला अामदार सुरेश भाेळे, अामदार स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, सरचिटणीस दीपक फालक उपस्थित हाेते.