आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय लॉबिंगद्वारेच मिळतात पद्म : रामदेव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रातील मोदी सरकारकडून पद्म विभूषण पुरस्कार जाहीर केला जाण्याआधीच तो नाकारणारे योगगुरू बाबा रामदेव यांनी शनिवारी पुरस्कार निवड प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित केले. पद्मच काय पण नोबेल पुरस्कारासाठीही मोठे लॉबिंग होते. राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्तीच ते मिळवण्यात यशस्वी होतात, असे रामदेव यांनी म्हटले.
पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण नोबेल पुरस्कार चांगल्या लोकांना दिला जातो. परंतु त्यासाठी लॉबिंग करावे लागते. हे जगाला माहीत आहे, असे रामदेव म्हणाले. असोचेमच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
येत्या २१ जून रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. त्याबाबत जाणीवजागृती करण्यासाठी असोचॅमच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रामदेव यांना यंदा पद्म विभूषण पुरस्कार दिला जाणार असल्याची चर्चा होती परंतु त्याआधीच रामदेव यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून हा पुरस्कार नाकारला होता. आपण संन्यासी असून देश आणि लोकांची सेवा करणे हे आपले कर्तव्य असल्याचे आपण मानतो, असे रामदेव यांनी पत्रात म्हटले होते.
1 कोटी किलो वजन घटवणार
ढेर पोट्या भारतीयांचे 1 कोटी किलो वजन कमी करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी देशभर स्थूलताविरोधी शिबिरे घेणार असल्याचे रामदेव यांनी सांगितले.