आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानातून परतलेला भारतीय जवान चंदू चव्हाण आज पोहाेचणार घरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - पाकिस्तानातून परतलेला जवान चंदू चव्हाणला घेऊन संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे शनिवारी धुळ्यात दाखल हाेणार अाहेत. अाठ महिन्यांनंतर चंदू त्याच्या बाेरविहीर या मुळ गावी जाणार अाहे. त्यासाठी त्याला १ महिन्याची सुटी मिळाली अाहे. चंदू चव्हाणच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्षाने शहरात तयारी केली अाहे. तर बोरविहीर ग्रामस्थही त्याची मिरवणूक काढणार अाहेत.   

राष्ट्रीय रायफलचा जवान चंदू चव्हाण चुकून नियंत्रणरेषा ओलांडून पाकिस्तानच्या तावडीत सापडला.  संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे अखेर चार महिन्यांनी पाकिस्तानने त्याला साेडले. या काळात त्याच्यावर प्रचंड अत्याचारही करण्यात आले. २१ जानेवारीला त्याला भारतीय सैन्याच्या हवाली करण्यात आले.  दुपारी १२ वाजेला मनोहर चित्रमंदिराजवळील शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भाजपतर्फे त्याचा सत्कार केला जाईल. यानंतर चंदू नातेवाइकांसह त्याच्या बोरविहीर गावी जाईल. तेथेही त्याचा सत्कार हाेणार असल्याची माहिती आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...