आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाळधी-धरणगाव दुसरा रेल्वेमार्ग सुरू, मालगाडीनंतर नवजीवन एक्स्प्रेस धावली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उधना ते जळगाव या ३०४ किलोमीटरच्या दुहेरी रेल्वेमार्गातील पाळधी ते धरणगाव या १९ किलोमीटरच्या दुसऱ्या रेल्वेलाइनची सुरुवात सोमवारी सकाळी ८.२० वाजता मालगाडीच्या प्रवासाने झाली. त्यानंतर सकाळी ९.१० वाजता जळगावहून सुरतकडे जाणारी नवजीवन एक्स्प्रेस या नव्या रेल्वेलाइनवरून धावली.

पाळधी ते धरणगाव या १९ किलोमीटरच्या दुसऱ्या रेल्वे लाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी तिची चाचणी घेण्यात आली होती. चाचणी घेण्यासाठी मुंबई येथून ३०० अधिकाऱ्यांचा ताफा पाळधीत दाखल झाला होता. चाचणीच्या वेळी ताशी १३४ किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे धावली होती. त्यानंतर विविध विभागांच्या चाचण्या पूर्ण होऊन अखेर २१ मार्च राेजी नवीन लाइन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. वेस्टर्न रेल्वेचा २२३० कोटी रुपयांचा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. या दुहेरीकरणामुळे जळगावहून गुजरात, राजस्थान जाण्यासाठी प्रचंड प्रमाणात वेळेची बचत होणार आहे. ३१ मार्च २०१७ पर्यंत हा संपूर्ण मार्ग दुहेरीकरण करण्याची डेडलाइन देण्यात आलेली आहे. ३०४ किलोमीटरपैकी आतापर्यंत ११५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तसेच जळगाव येथील दूध फेडरेशन समोरील झोपडपट्टीमुळे २०० मीटरचा मार्गही टाकला गेलेला नाही. हा वाद सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यात काम होऊ शकले नाही. दुहेरी मार्गामुळे पाळधी ते धरणगाव हे १९ किलोमीटरचे अंतर १० ते १५ मिनिटात कापणे शक्य होणार असल्याचे अभियंता अग्रवाल यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...