आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Paldhi Autorickshaw Driver Attempt To Set Fire Himself At RTO Office

पाळधीच्या रिक्षाचालकाचा अारटीअाे कार्यालयात जाळून घेण्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तालुका पाेलिस ठाण्यात जप्त केलेली रिक्षा न्यायालयात दंड भरून घेण्यासाठी गेलेल्या चालकाला रिक्षाची स्टेपनी बॅटरी चाेरी झाल्याचे लक्षात अाले. तक्रार करून देखील ती मिळाली नाही. त्यामुळे संतप्त रिक्षाचालकाने गुरुवारी अारटीअाे कार्यालयात अंगावर राॅकेल अाेतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला.

पाळधी येथील स्वप्निल कुलकर्णी (वय २८) हा पाळधी ते जळगावदरम्यान रिक्षा चालवताे. २३ डिसेंबरला उपप्रादेशिक परिवहन विभाग अाणि राज्य परिवहन महामंडळाच्या पथकाने त्याच्यावर परवान्यापेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात असताना खाेटेनगरजवळ कारवाई केली. कारवाई करून रिक्षा तालुका पाेलिस ठाण्याच्या अावारात लावली. स्वप्निल याने न्यायालयात हजार रुपये अाणि अारटीअाे कार्यालयात २२०० रुपयांचा दंड भरून रिक्षा साेडवण्यासाठी गेला. त्या वेळी रिक्षातील स्टेपनी अाणि बॅटरी चाेरी झाल्याचे त्याच्या लक्षात अाले. त्याने तक्रार करून चाेरी झालेल्या वस्तू मागितल्या. मात्र, त्या मिळाल्याने त्याने गुरुवारी अारटीअाे कार्यालयात दुपारी ३.३० वाजता अंगावर राॅकेल अाेतून अात्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, त्याला रामानंदनगर पाेलिसांनी ताब्यात घेतले.


४५ मिनिटे तणावाचे वातावरण
रिक्षातीलस्टेपनी अाणि बॅटरी मिळत नसल्याने स्वप्निल याने अात्मदहनाचा इशारा दिला हाेता. त्यानुसार त्याचे वडील पांडुरंग कुलकर्णी यांच्यासह ताे गुरुवारी दुपारी ३.३० वाजता अारटीअाे कार्यालयात अाला. मात्र, कार्यालयात एकही वरिष्ठ अधिकारी नव्हता. त्याने अात्मदहन करण्याचा इशारा दिला. काही वेळानंतर त्याने अंगावर राॅकेल अाेतले. मात्र, रामानंदनगर पाेलिस ठाण्याचे कर्मचारी दुपारी ४.१५ वाजता अाल्याने त्याला ताब्यात घेतले.

रिक्षा पाेलिस ठाण्यात लावली
उपप्रादेशिकपरिवहन विभाग अाणि राज्य परिवहन महामंडळाच्या पथकाने कारवाई केल्यानंतर रिक्षा तालुका पाेलिस ठाण्यात लावली हाेती. तसेच वाहनातील खुले भाग घेऊन जाण्याच्या सूचना अाहेत. त्यामुळे या प्रकरणाशी अारटीअाे कार्यालयाचा संबंध नाही. सदाशिव वाघ, माेटार वाहन निरीक्षक
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने रिक्षावर कारवाई केली. त्यानंतर रिक्षा तालुका पाेलिस ठाण्यात अाणली. मात्र, त्या कारवाईशी किंवा वाहन सांभाळण्याची जबाबदारी अामची नाही. सागर शिंपी, सहायक पाेलिस निरीक्षक