आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर! पाळधी ते जळगाव नवा रेल्वे मार्ग तयार; येत्‍या 15 दिवसांत धावणार रेल्‍वे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी दोन खुशखबर आहेत. जळगाव-सुरत दुहेरी रेल्वे मार्गावरील पाळधी ते जळगाव या 9 किलोमीटर नव्याने तयार झालेल्या रेल्वे रुळांची रविवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. येत्या १५ दिवसात ही नवी लाईन रेल्वे वाहतुकीसाठी खुली होणार आहे. तर दुसरी आनंदाची बातमी म्हणजे, जळगाव स्थानकातील चौथ्या प्लॅटफॉर्मचेही काम जोरात सुरू झाले असून येत्या वर्षअखेरपर्यंत हे काम पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्यांना होणारा विलंब दूर होणार आहे.

जळगाव सुरत दुहेरी रेल्वे मार्गातील पाळधी ते जळगाव या किलोमीटरच्या नव्याने तयार झालेल्या रेल्वे रुळांची चाचणी रविवारी दिवसभर करण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या रेल्वेरूळावरून ताशी १३० किलो मीटर वेगाने विशेष रेल्वेगाडी धावली. या यशस्वी चाचणीनंतर १५ दिवसांनी हा रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे.
 
गेल्या वर्षी पाळधी ते धरणगाव या मार्गाची चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी पाळधी ते जळगाव रेल्वे रुळालगत दांडेकरनगर झोपडपट्टी होती. त्यामुळे येथे निर्माणकार्य थांबले होते. हे अतिक्रमण काढल्यानंतर किलोमीटरचा रेल्वेमार्ग तयार करण्यात आला. रविवारीपश्चिम रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त सुशील चंद्र, मुख्य प्रशासकीय अधिकारी एम.के.गुप्ता, सुरत येथील उप मुख्य अभियंता एस.पी.भेरवा यांच्या उपस्थितीत रेल्वेरूळाची चाचणी घेण्यात आली. यात सर्व प्रकारे रूळाची तपासणी झाली. त्यानंतर पाळधी ते जळगाव दरम्यान विशेष रेल्वेगाडी धावली. या वेळी जळगाव, सुरत, नंदुरबार येथील रेल्वेच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 
आता ३५ किलोमीटरचे काम शिल्लक
सुरतते जळगाव दुहेरीकरणाच्या मार्गाला सुमारे वर्षांपासून सुरुवात झाली आहे. टप्प्या-टप्प्याने दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत जळगाव ते दोंडाईचा हा ११५ किलोमीटर, नंदुरबार ते सुरत हा १५० किलोमीटरचा मार्ग पूर्णपणे तयार झाला आहे. आता केवळ नंदुरबार ते दोंडाईचा हा ३५ किलोमीटरचा मार्ग शिल्लक राहिला आहे. त्यानंतर सुरत-जळगाव हा मार्ग दुहेरी झालेला असेल, अशी माहिती भैरवा यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
 
५०० मीटरचा आकर्षक ब्रीज
पाळधी-जळगाव दरम्यान गिरणा नदी आहे. नदीवर आधीच्या सिंगल लाइनचा एक ब्रीज आहे. आता दुहेरीकरणासाठी ५०० मीटर लांबीचा नव्याने एक ब्रीज तयार केला आहे. अत्यंत आकर्षक असा हा ब्रीज आहे. या पुलावर देखील सुमारे तास वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या. इलेक्ट्रिक विभागाचे स्वतंत्र पथक चाचणीसाठी आले होते. दरम्यान, हा ब्रीज नदीसह परिसरातील सौंदर्य वाढवत आहे. ही चाचणी पाहण्यासाठी पाळधी, बांभोरी येथील नागरिकांनी देखील गर्दी केली होती.
 
बातम्या आणखी आहेत...